घरक्रीडाBWF World Championship : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूची विजयी सलामी; २४ मिनिटांत...

BWF World Championship : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूची विजयी सलामी; २४ मिनिटांत जिंकला सामना

Subscribe

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी भारतीय खेळाडूंनी चमकदार खेळी केली

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी भारतीय खेळाडूंनी चमकदार खेळी केली. जागतिक पातळीवर चॅम्पियन राहिलेल्या पी.व्ही सिंधूने तिच्या हंगामाची सुरूवात विजयी सलामीने केली आहे. सिंधूने तिच्या पहिल्याच सामन्यात स्लोवाकिया मार्टिनाचा २१-७, २१-९ अशा फरकाने पराभव केला. पी.व्ही सिंधूसोबतच लक्ष्य सेन, श्रीकांत किदांबी यांनी देखील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. तसेच भारताने पुरुष दुहेरीत एस.के. रँकीरेड्डी, चिराग शेट्टी या जोडीने तैपेईच्या जोडीला पराभूत केले. लक्षणीय बाब म्हणजे पी.व्ही सिंधूने केवळ २४ मिनिटांत पहिला सामना जिंकला. सिंधूने सामन्याची सुरूवातच ४-१ ने केली होती, त्यानंतर स्कोर ११-४ पर्यंत देखील पोहचला. मात्र यानंतर पी.व्ही सिंधूने शानदार पध्दतीने स्कोर करायला सुरूवात केली.

- Advertisement -

सिंधूने तिच्या दोन्हीही सेटमध्ये २१-७, २१-९ अशा पध्दतीने विजय मिळवला. सिंधू व्यतिरिक्त लक्ष्य सेनने जपानच्या केंटा निशिमोटोचा २२-२०, १५-२१, २१-१८ अशा फरकाने पराभव केला. तर पुरुष दुहेरीत एस. रँकिरेड्डी, चिराग शेट्टी यांनी तैपेईच्या ली-झे हुई, यांग पो यांचा २७-२५, २१-१७ असा पराभव केला. भारतीय जोडीने आपला सामना ४३ मिनिटांत जिंकला.

- Advertisement -

दरम्यान, भारताच्या सौरभ शर्मा, अनुष्का पारिख यांच्या जोडीला आपापल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मलेशियाच्या जोडीने दोघांनाही २१-८, २१-१८ अशा फरकाने धूळ चारली. तर भारताचा स्टार खेळाडू श्रीकांत किदांबीने चीनच्या ली शी फेंगला त्याच्या पहिल्याच सामन्यात पराभूत केले. किदांबी पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर त्याने सलग दोन सेटमध्ये विजय मिळवला, सामन्याच्या अखेरीस किदांबीचा स्कोर १५-२१, २१-१८, २१-१९ एवढा राहिला.


हे ही वाचा : http://Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाडची कोहलीच्या विक्रमाची बरोबरी; ५ सामन्यांत झळकावले चौथे शतक


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -