घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधूची फायनलमध्ये एन्ट्री

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधूची फायनलमध्ये एन्ट्री

Subscribe

भारताची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीला २१-१६ आणि २४-२२ अशा सरळ दोन सेट्समध्ये नमवत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच सिंधूने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

चीनच्या नानजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीला सरळ सेट्समध्ये नमवत सामना आपल्या नावे केला असून सिंधूने सामना २१-१६ आणि २४-२२  च्या फरकाने आपल्या नावे केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात सिंधूने अखेरच्या क्षणी आफला खेळ उंंचावत सामन्यात विजय मिळवला. यानंतर सिंधूचा फायनलचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याविरूद्ध रंगणार आहे.

- Advertisement -

असा झाला सामना

शनिवारी झालेला सिंधू आणि अकाने यामागुची यांच्यातील उपांत्यफेरीचा सामना अत्यंत चुरशीचा झाला असून सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सामन्याच रंगत बनून होती. अखेरच्या काही क्षणात सिंधूने आपला खेळ उंचावत सामन्यात विजय मिळवला आणि स्पर्धेच्या फायनलमध्ये झेप घेतली. तब्बल ५५ मिनीटे चाललेल्या सामन्यात सुरूवातापासूनच सिंधूने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सेटमध्ये सुरूवातीला अकानेने काही गुण आपल्या नावे केले मात्र नंतर सिंधूने आपला अप्रतिम खेळ दाखवत पहिल्या सेटमध्ये २१-१६ च्या फरकाने सहज विजय मिळवला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये सुरूवातीपासूनच जपानच्या अकानेने अप्रतिम खेळ केला. सामन्याच्या एका क्षणाला सिंधू आणि अकाने हिच्यात बऱ्याच गुणांचा फरक असताना सिंधूने आपला खेळ उंचावत सामन्यात पुनरागमन केले. नंतर अगदी २०-२० असा स्कोर असताना अकानेने गुण मिळवला आणि सामन्यात बरोबरीचा गुणसंख्या झाली. त्यामुळे अशी परिस्थिती झाली की जो खेळाडू आधी २ गुणांची लीड घेईल तो विजेता घोषित होईल. त्याच क्षणी सिंधूने अप्रतिम खेळ करत २४ गुण मिळवत सामन्यात विजय मिळवला.

फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिनाचे आव्हान

उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीला२१-१६ आणि २४-२२ च्या फरकाने मात दिल्यानंतर आता सिंधूचा फायनलचा सामना हा स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याविरूद्ध रंगणार आहे. कॅरोलिना हीने शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात भारताची फुलराणी म्हणून संबोधले जाणाऱ्या स्पर्धेबाहेर केले होते. कॅरोलिनाने सायनाला २१-६ आणि २१-११ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केले होते. त्यामुळे आता कॅरोलिनाचे आव्हान सिंधू कशी पेलणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील. हा सामना रविवारी ५ ऑगस्टला रंगणार असून याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्टस आणि स्टार स्पोर्टस २ एच डी या दोन चॅनेल्सवर होणार आहे. याचसोबत मोबाईलवर सामना बघायचा असल्यास हॉटस्टार ऑनलाइन अॅपवर देखील सामना ऑनलाइन दाखवला जाणार आहे.

Carolina Marin
कॅरोलिना मरीन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -