रोहित शर्माने हिट करताच स्टेडियममध्ये बसलेल्या मुलीला लागला बॉल, व्हिडीओ व्हायरल

भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडला जोर का झटका दिला आहे. तीन सामन्यांतील वनडे सीरिजचा पहिला सामना मंगळवारी ओव्हलमध्ये खेळण्यात आला. ज्यामध्ये टीम इंडियाने १० विकेटच्या जोरावर सीरिजमध्ये १-० ने मात केली आहे.

सामन्यांमध्ये हिटमॅन रोहित शर्मा उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने अनेक षट्कार आणि ७६ नाबाद धावा केल्या आहेत. रोहितने सामन्यांमध्ये ५ मोठे षट्कार लगावले आहेत. दरम्यान त्याने एक असा षट्कार लगावला की, ज्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या एका लहान मुलीला तो बॉल लागला.

टीम इंडियातून रोहित शर्मा खेळत असताना पाचव्या ओव्हर्समध्ये ही घटना घडली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने बॉल टाकला होता. या बॉलवर रोहित शर्माने हिट करताच हा बॉल थेट स्टेडियममध्ये बसलेल्या एका सहा वर्षाच्या मुलीला लागला. बॉल लागल्यानंतर त्यांच्या जवळील लोकांनी त्या मुलीला संभाळलं. मुलीसोबत तिचे वडील आहेत. तिच्या वडिलांनी मुलीला मिठी मारली. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेल्या मुलीचं नाव मीरा साल्वी असं आहे. तिचं वयवर्ष ६ आहे. या सहा वर्षाच्या मुलीलाच बॉल लागला होता. परंतु ती आता पूर्णपणे बरी आहे. मुलीला बॉल लागल्यानंतर मेडिकल स्टाफ तिच्या मदतीला धावून आला होता. मात्र, हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.


हेही वाचा : मराठमोळ्या ऐश्वर्याची विम्ब्लडन वारी, अंडर – १४ चॅम्पियनशिपमधील एकमेव भारतीय