घरक्रीडाकर्णधार, प्रशिक्षकांना माझे महत्त्व माहित!

कर्णधार, प्रशिक्षकांना माझे महत्त्व माहित!

Subscribe

चेतेश्वर पुजारा भारतीय कसोटी संघाचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर बरेचदा टीकेची झोड उठते. सध्याच्या टी-२० क्रिकेटच्या जमान्यातही पुजारा संयमाने फलंदाजी करत असल्याने कसोटी क्रिकेटच्या चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जाते. मात्र, त्याच्या संथ फलंदाजीमुळे संघाला सामने जिंकणे अवघड जाऊ शकते असेही म्हटले जाते. मागील आठवड्यातच रणजीच्या अंतिम सामन्यात पुजाराने ६६ धावा करण्यासाठी २३७ चेंडू घेतले होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या संथ फलंदाजीची बरीच चर्चा झाली. मात्र, पुजारा याकडे फारसे लक्ष देत नाही.

ड्रेसिंग रूममध्ये माझ्या कमी स्ट्राईक रेटबद्दल चर्चा होत नाही. मीडियामध्ये माझ्या खेळण्याच्या पद्धतीचे वेगळ्याप्रकारे वर्णन केले जाते. मात्र, संघ व्यवस्थापन नेहमी मला पाठिंबा दर्शवतात. कर्णधार आणि प्रशिक्षक यांना माझ्या खेळण्याच्या पद्धतीचे महत्त्व माहित आहे. लोक जेव्हा स्ट्राईक रेटबाबत चर्चा करतात, तेव्हा ते संघ व्यवस्थापनाचे मत जाणण्यास उत्सुक असतात. मात्र, मी हे स्पष्ट करु इच्छितो की, ते माझ्यावर कधीच दबाव टाकत नाहीत, असे पुजारा म्हणाला.

- Advertisement -

तसेच त्याने पुढे सांगितले, रणजीच्या अंतिम सामन्यादरम्यान सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यात आला की, मी धावा करण्यासाठी इतका वेळ का घेतो? मी याकडे लक्ष देतो का, तर अजिबातच नाही. माझा संघ जिंकण्यासाठी आवश्यक ते करणे, हे माझे काम आहे. मी डेविड वॉर्नर किंवा विरेंद्र सेहवाग यांच्याप्रमाणे फलंदाजी करु शकत नाही. परंतु, इतर फलंदाज माझ्याप्रमाणेच धावा करण्यासाठी वेळ घेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -