…यामुळे विराट कोहलीला अटक करण्याची केली जातेय मागणी

विराट कोहली व्यतिरिक्त अभिनेत्री तमन्ना भाटिया विरोधातही असाच आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case filed against virat kohli in madras high court for promoting online gambling and demand arrest
...यामुळे विराट कोहलीला अटक करण्याची केली जातेय मागणी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप विराट कोहलीवर केला आहे. त्यामुळे त्याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. विराट कोहली व्यतिरिक्त अभिनेत्री तमन्ना भाटिया विरोधातही असाच आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

चेन्नईच्या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेत याचिकाकर्त्याने एमएचसीकडे ऑनलाईन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तरुणांमध्ये हे Appचे व्यसन वाढत चालले आहे. ऑनलाईन जुगार कंपन्या तरुणांचे ब्रेन वॉश करण्यासाठी विराट कोहली आणि तमन्ना सारख्या सेलिब्रिटींचा वापर करत आहे. त्यामुळेच या दोघांना अटक केली पाहिजे. ऑनलाईन जुगारासाठी घेतलेले पैस परत न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या तरुणांचा संदर्भ या याचिकेत दिला आहे.

सध्या या दिवसात ऑनलाईन मॅच खेळली जात आहे आणि याच्या जाहिराती क्रिकेट स्टार करताना दिसत आहे. विराट ऑनलाईन गेम्स जाहिरात करताना दिसत आहे. तसेच आजकाल विराट कोहलीसुद्धा इतर भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे घरी असून तो १३व्या सत्र आयपीएलची तयारी करत आहे. आयपीएल २०२० ची सुरुवात युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून होणार असून अंतिम सामना ८ नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान १० नोव्हेंबरला अंतिम फेरीचे आयोजन केले जाऊ शकते, असे देखील म्हटले जात आहे.

युएईमध्ये आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ तेथून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घ्यावा लागेल आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळल्या जातील.


हेही वाचा – गौतम गंभीर घेणार २५ Sex Workers च्या मुलींची जबाबदारी