नवी दिल्ली : आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तान संघाला श्रीलंकेसोबतचा सामना काही केल्या जिंकावाच लागणार आहे. सुपर फोरच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच बदल केले आहेत. श्रीलंकेसोबतच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी पाकिस्तानने काही नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.(Cautious step by Pakistan team after defeat Major changes made in the team for the match against Sri Lanka)
आशिया चषकातील नॉकआऊट सामन्यांना सुरुवात झाली आहे. भारताकडून मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाने आता सावध पाऊले उचलली आहेत. आज होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाने मोहम्मद हरिस, सौद शकील, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि जमान खान यांचा संघात समावेश केला आहे. या खेळाडूंनी आशिया कपमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.
या खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
पाकिस्तान संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून सलामीवीर फखर जमान, सलमान आगा, फहीम अश्रफ, नसीम शाह आणि हरिस रौफ यांना वगळण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात फहीम अश्रफ याने अगदीच कमकुवत कामगिरी केली असून, फखर जमानची कामगिरीही विशेष नव्हती. या सर्व खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.
हेही वाचा : Gashmeer Mahajani: गश्मीर महाजनीची पोस्ट व्हायरल; शेअर केलं स्वप्न
वेगवान गोलंदाजही संघाबाहेर
फलंदाजांव्यतिरिक्त पाकिस्तान संघाने वेगवान गोलंदाजांनाही संघातून वगळले आहे. ज्यात वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफ यांचा समावेश आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात नसीम आणि हरिस यांना दुखापत झाली होती. त्यामुळे दोन्ही गोलंदाजांना संघातून वगळण्यात आले. तर फलंदाज सलमान आगा भारताविरुद्ध फलंदाजी करताना चेहऱ्यावर चेंडू लागल्याने जखमी झाला. लवकरच तिन्ही खेळाडूंनाही पाकिस्तानला पाठवले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : IND vs SL : भारताच्या विजयानंतर स्टेडियममध्ये राडा; दोन्ही संघाचे चाहते भिडले, व्हिडीओ व्हायरल
पाकव्याप्त कश्मीरमधील खेळाडूचे पदार्पण
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जन्मलेला क्रिकेटर जमान खान या सामन्यातून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर येथील गरीब कुटुंबातील हा खेळाडू काश्मीर लीगमध्ये खेळला होता.