घरक्रीडासेंट्रल बँक उपांत्य फेरीत

सेंट्रल बँक उपांत्य फेरीत

Subscribe

मुंबई शहर निवड चाचणी कबड्डी

बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला व्यावसायिक गटात साई सिक्युरिटी, मध्य रेल्वे-मुंबई विभाग, जे. जे. रुग्णालय यांनी उपांत्य फेरी गाठली.

पुरुष विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया इन्शुरन्सचा ३३-२८ असा पराभव केला. नितीन देशमुख, जितेश पाटील यांच्या चढाई-पकडीच्या खेळामुळे बँकेने मध्यंतराला १७-७ अशी भक्कम आघाडी घेतली होती. दुसर्‍या सामन्यात सेंट्रल बँकेने मध्यंतरातील ७-१३ अशी पिछाडी भरून काढत मध्य रेल्वे विभागावर २०-१९ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. रोहित पाटील, विनायक मोरे सेंट्रल बँकेच्या या विजयात चमकले. बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या आव्हान ३१-२९ असे परतवून लावले.

- Advertisement -

महिला व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत साई सिक्युरिटीने सिद्धी ठाकूर, रुपाली महाडिकच्या खेळामुळे इनफिल्ड टाऊनचा ४४-१८ असा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात मध्य रेल्वे-मुंबई विभाग संघाने वैभव टूर्स अँड ट्रॅव्हलला ४८-२९ असे पराभूत केले. जे.जे. रुग्णालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेवर २७-१५ अशी मात केली.

जिजामाता संघ तिसर्‍या फेरीत

महिला ज्युनियर गटाच्या दुसर्‍या फेरीत जिजामाता संघाने चंद्रोदय क्रीडा मंडळ ब संघाला ५४-१२ असे पराभूत करत तिसरी फेरी गाठली. प्रीती हांडे, योगिता सपकाळ जिजामाताकडून उत्कृष्ट खेळल्या. गोल्फादेवी प्रतिष्ठानने प्रता स्पोर्ट्सचा ४४-१८ असा धुव्वा उडवत आगेकूच केली. अंकुर स्पोर्ट्सने महर्षी दयानंद स्पोर्ट्सचा ५०-१८ असा, तर शिवशक्ती महिला ब संघाने श्री स्वामी समर्थचा ३५-२० असा पराभव करत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -