चहलला आली धोनीची आठवण, इंस्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट

dhoni and chahal

टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला धोनीची आठवण येत आहे. त्याने कित्येक वेळा लाईव्ह येत याबाबत बोललं आहे. दरम्यान, चहलने स्वत: चा महेंद्रसिंग धोनीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दोघेही धोनीबरोबर चालताना दिसत आहेत.

युजवेंद्र चहलने धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘एक संस्मरणीय चाल.’ असं कॅप्शन दिलं आहे. चहलने आपल्या कॅप्शनमध्ये सिंहाचा इमोजी देखील जोडला आहे. चहलने शेअर केलेला फोटो इंग्लंडमधील गतवर्षीच्या वर्ल्ड कपचा आहे. धोनीने वर्ल्ड कप २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामना हा आंतरराष्ट्रिय क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे.

युजवेंद्र चहल को याद आए धोनी, इंस्टाग्राम पर शेयर की इमोशनल पोस्ट

याआधीही युजवेंद्र चहल सोशल मीडियावर अनेकदा धोनीची आठवण काढत आहे. चहलने एकदा टीम बसमधी धोनीची मागील सीटचं छायाचित्र शेअर केलं आणि म्हटलं होतं की त्याची जागा अद्याप रिक्त आहे. दरम्यान, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत युझवेंद्र चहल म्हणाला होता की, जेव्हा धोनी भाई न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात बाद झाला होता आणि पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा तो क्षण खूपच दु:ख देणारा होता. चहल म्हणाला की धोनी बाद झाल्यानंतर वर्ल्ड कप संपला होता. धोनी बाद झाला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते असं चहलने म्हटलं होतं.


हेही वाचा – विराट कोहली कर्णधार म्हणून अपयशी – गौतम गंभीर