घरक्रीडाभारतासमोर कोणाचे आव्हान?

भारतासमोर कोणाचे आव्हान?

Subscribe

क्रिकेट विश्वचषकात शुक्रवारी पाकिस्तान आणि बांगलादेश या आशियाई संघांमध्ये सामना होणार आहे. भारताविरुद्ध मागील सामना गमावल्यामुळे बांगलादेश आगेकूच करू शकणार नाही हे निश्चित झाले. पाकिस्तानला मात्र अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्यांना बांगलादेशचा ३१६ पेक्षा अधिक धावांनी पराभव करावा लागेल. बांगलादेशचे या स्पर्धेतील प्रदर्शन बघता ते इतक्या धावांनी सामना गमावतील याची शक्यता कमीच आहे. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. त्यामुळे या सामन्याकडे पाकिस्तानी चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचप्रमाणे भारतीय चाहतेही हा सामना आवर्जून पाहतील.

याचे कारण म्हणजे विश्वचषकाच्या गुणतक्त्यात भारत सध्या दुसर्‍या स्थानी असून त्यांचे ८ सामन्यांत १३ गुण आहेत. पहिल्या स्थानी असणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ८ सामन्यांनंतर १४ गुण आहेत. शनिवारी भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेशी, ऑस्ट्रेलियाचा अखेरचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारताने श्रीलंकेवर मात केल्यास आणि ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास भारत १५ गुणांसह अव्वल स्थानी जाईल. त्यामुळे उपांत्य फेरीत त्यांचा सामना चौथ्या क्रमांकावर असणार्‍या संघाशी सामना होईल. सध्या चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ असून, त्यांचे ९ सामन्यांनंतर ११ गुण आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानने त्यांचा सामना जिंकल्यास त्यांचे ९ सामन्यांनंतर ११ गुण होतील, पण न्यूझीलंडचा नेट रनरेट सरस असल्याने पाकिस्तानला आगेकूच करण्यासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना ३१६ पेक्षा अधिक धावांनी जिंकावा लागेल. तसे झाल्यास भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना होऊ शकेल. मात्र, ऑस्ट्रेलियाने त्यांचा अखेरचा सामना जिंकल्यास ते पहिल्या स्थानी कायम राहतील आणि उपांत्य फेरीत चौथ्या क्रमांकावरील संघाविरुद्ध सामना खेळतील. भारताचा सामना यजमान इंग्लंडशी होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -