नवी दिल्ली : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आस्ट्रेलियाला 4 विकेट्सनी पराभूत केले. यावेळी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने केलेल्या 84 धावा तसेच, के.एल. राहुलच्या नाबाद 42 आणि श्रेयस अय्यरच्या 45 धावांनी भारतीय संघाने 265 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले. यावेळी भारतीय संघाने 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली. अशामध्ये ऑस्ट्रेलियाला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे. कारण ऑस्ट्रेलियातील एका खेळाडूने या पराभवानंतर मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले. (Champions Trophy 2025 after lossing semi final with India Australia player decision)
हेही वाचा : IND vs AUS : 2023च्या पराभवाचा वचपा काढला, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर विजय अन् फायनलचे तिकीट
भारतीय संघासोबत झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एकदिवसीयमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचा कर्णधार होता. पण, त्याच्या नेतृत्वात संघ फक्त उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला. अशा परिस्थितीत आता त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. असे असले तरीही तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. त्याने 2028 च्या ऑलिंपिकमध्येही देशासाठी क्रिकेट खेळण्याची इच्छा दर्शविली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने स्मिथ कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
The great Steve Smith has called time on a superb ODI career 👏 pic.twitter.com/jsKDmVSG1h
— Cricket Australia (@CricketAus) March 5, 2025
दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथने आपल्या संघातील सहकाऱ्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच यावेळी तो म्हणाला की, खेळामधून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, “हा एक विलक्षण प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला. एकदिवसीय क्रिकेटमधील उत्तम आठवणी सोबत घेऊन जाणार आहे. दोन विश्वचषक जिंकणे ही माझ्यासाठी एक विलक्षण कामगिरी होती. तसेच हा प्रवास शेअर करण्यासाठी अनेक उत्तम सहकारी लाभले. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी इतर लोकांना एक उत्तम संधी आहे. त्यामुळे असे वाटते की आता खेळातून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे.” असे मत त्याने व्यक्त केले.