Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : सर्वच संपले आहे, पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने केले मान्य

Champions Trophy 2025 : सर्वच संपले आहे, पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने केले मान्य

Subscribe

तुमच्यात ताकद असेल किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जिंकू शकता, तर ते केले पाहिजे. अन्यथा, मला दुसऱ्यावर विसंबून राहणे आवडत नाही. आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो तरी मला काही फरक पडत नाही.

इस्लामाबाद : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत न्यूझीलंडपाठोपाठ भारतीय संघाकडून पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. हे दोन्ही संघांची कामगिरी खूपच चांगली होती. त्या तुलनेत आमचा खेळ झाला नाही. आता सर्वच संपले आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानने दिली आहे. इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहात उपांत्य फेरी गाठणे हे कर्णधार म्हणून मला पसंत नाही, असेही त्याने सांगितले. पाकिस्तानचा आता बांगलादेशविरुद्ध एक सामना आहे, मात्र, तोह जिंकला तरी पाकिस्तानला त्याचा काहीही फायदा होणार नाही. (Champions Trophy 2025: Captain Rizwan admits that Pakistan’s challenge is over)

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रिझवानने आपल्या भावना व्यक्त केल्या. तूर्तास एवढेच म्हणू शकतो की, सर्व काही संपले आहे. आता आमच्याकडे काहीही नाही. हेच सत्य आहे. आता न्यूझीलंडबरोबरच्या सामन्या बांगलादेश काय करतो, न्यूझीलंड आणि भारत यांच्या सामन्यात काय होते ते पाहू. आमच्याकडे काही नाही, याची कल्पना आहे, पण अल्लाहकडून आशाही आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आता आम्ही आता इतर संघांच्या कामगिरीवर निर्भर आहोत. पण कर्णधार म्हणून प्रामाणिकपणे सांगतो की, या गोष्टी मला आवडत नाहीत, असे तो म्हणाला.

हेही वाचा – S. Jaishankar : प्रत्येक गोष्टीसाठी भारतावर आरोप करणे हा मूर्खपणा, एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले

तुमच्यात ताकद असेल किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जिंकू शकता, तर ते केले पाहिजे. अन्यथा, मला दुसऱ्यावर विसंबून राहणे आवडत नाही. आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो तरी मला काही फरक पडत नाही. न्यूझीलंड आणि भारत या संघांनी आम्हाला पराभूत केले आहे. आम्ही तो पराभव स्वीकारतो. ते चांगले खेळले, आम्ही वाईट खेळलो. आम्ही चांगले खेळलो, असे आम्ही आता असे म्हणू शकत नाही. आम्ही आता इतरांवर अवलंबून आहोत. अल्लाहची इच्छा असेल तर संधी मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेश संघाने आज अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले आणि पाकिस्तानने बांगलादेशला मोठ्या फरकाने हरवले तरच पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. याशिवाय, अ गटात भारतीय संघाने न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केले तरच, पाकिस्तानचे आव्हान टिकून राहू शकते. एवढेच नव्हे तर, विजयाबरोबरच पाकिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंड आणि बांगलादेशपेक्षा जास्त असला पाहिजे.

हेही वाचा – Holi in Pakistan : होळी साजऱ्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीस, कराचीतील खासगी विद्यापीठावर टीका