नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा रणसंग्राम सुरू होणार आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू पाकिस्तान आणि यूएईमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने नुकतेच पंच पॅनेल आणि मॅच रेफरी पॅनेलची घोषणा केली आहे. पण याचसोबत आता भारतीय क्रिकेटप्रेमींचीदेखील चिंता वाढली आहे. 12 पंचांचे एक पॅनेल आहे, ज्यामध्ये 6 पंच हे 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील सहभागी होते. पण यामध्ये असलेल्या दोन पंचाचा भारतीय संघासोबत एक विशेष इतिहास आहे. (Champions Trophy 2025 full list of match officials for icc champions trophy 2025)
हेही वाचा : Thiago Messi : बाप से बेटा सवाई, मेस्सीच्या मुलाने 10 हून अधिक गोल मारत संघाला केले विजयी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून, श्रीलंकेचे रंजन मदुगले आणि झिम्बाब्वेचे अँड्र्यू पायक्रॉफ्ट यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मॅच रेफरी म्हणून नियुक्त केले. तर, पंचांच्या पॅनेलमध्ये कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, अहसान रझा, पॉल रायफेल, शराफुद्दुल्लाह इब्ने शाहिद, रॉड टकर, अॅलेक्स व्हार्फ आणि जोएल विल्सन यांचा समावेश आहे. यावेळ आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रिचर्ड केटलबरो यांचा पॅनेलमध्ये समावेश केला आहे.
असा आहे इतिहास
पंच रिचर्ड केटलबरो आणि भारतीय संघाचा एक विशेष इतिहास राहिला आहे. भारतीय संघाचा सामना असताना ते जेव्हा जेव्हा पंच राहिले, तेव्हा तेव्हा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रिचर्ड केटलबरो यांनी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहिले होते. त्यापूर्वी 2021 आणि 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, 2015 मध्ये झालेला एकदिवसीय विश्वचषकचा उपांत्य सामना, 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना, 2014च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतच अंतिम सामना तसेच 2016 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे या सर्व सामन्यात रिचर्ड केटलबरो यांनीच पंच म्हणून काम पाहिले होते.
असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा