नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे दिल्याची घोषणा केल्यापासून बीसीसीआय या निर्णयाविरोधात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच, बीसीसीआयचा नकार असतानाही पीसीबी मात्र यजमानपद न सोडण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आयसीसीसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. असे असतानाही आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. (Champions Trophy 2025 icc champions trophy tour schedule India from Pakistan)
हेही वाचा : CM Eknath Shinde on Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनी सांगितले राज ठाकरेंसोबत संबंध बिघडले का?
तब्बल 8 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. असे असतानाही आयोजन नेमकं कोण करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असे असतानाही चॅम्पिअन्स ट्रॉफी ही भारतात येणार असल्याची घोषणा आयसीसीने केली आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013मध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. भारतीय चाहत्यांसाठी चॅम्पिअन्स ट्रॉफी ही 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी पाहता येणार आहे. दरम्यान, आयसीसीने केलेल्या या घोषणेचा आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदाशी काहीही संबंध नाही.
असे असेल चॅम्पियन्स ट्रॉफी दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
16 नोव्हेंबर – इस्लामाबाद, पाकिस्तान
17 नोव्हेंबर – तक्षशिला आणि खानपूर, पाकिस्तान
18 नोव्हेंबर – अबोटाबाद, पाकिस्तान
19 नोव्हेंबर – मुरी, पाकिस्तान
20 नोव्हेंबर – नाथिया गली, पाकिस्तान
22-25 नोव्हेंबर – कराची, पाकिस्तान
26-28 नोव्हेंबर – अफगाणिस्तान
10-13 डिसेंबर – बांगलादेश
15-22 डिसेंबर – दक्षिण आफ्रिका
25 डिसेंबर ते 5 जानेवारी – ऑस्ट्रेलिया
6-11 जानेवारी – न्यूझीलंड
12-14 जानेवारी – इंग्लंड
15-26 जानेवारी – भारत