Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाChampions Trophy 2025 : पाकिस्तानचे यजमानपद जाणार की राहणार? आयसीसी घेणार अंतिम...

Champions Trophy 2025 : पाकिस्तानचे यजमानपद जाणार की राहणार? आयसीसी घेणार अंतिम निर्णय

Subscribe

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरून सुरू असलेल्या वादावर अखेर लवकरच तोडगा निघणार असल्याचे समोर आले आहे. कारण, भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास जाणार की नाही? तसेच, पाकिस्तानचे यजमानपद जाणार की राहणार? यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्सिल लवकरच आपला अंतिम निर्णय जाहीर करू शकतात. कारण, शुक्रवारी (29 नोव्हेंबर) आयसीसीची बैठक होणार आहे. यावेळी या स्पर्धेबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. (Champions Trophy 2025 ICC meeting on competition future of Pakistan and India)

हेही वाचा : Jasprit Bumrah : बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप! आयसीसीचे नियम काय सांगतात? 

- Advertisement -

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या भूमिकेमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे भवितव्य अधांतरी आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर आता लवकरच तोडगा निघू शकतो, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 8 संघांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य ठरवण्यासाठी शुक्रवारी (29 नोव्हेंबर) बैठक होणार आहे. एकीकडे या स्पर्धेसाठी पाकिस्तानने जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे आयसीसीला भारतीय संघांचे या स्पर्धेत नसणे, परवडणारे नाही. त्यामुळे मधला मार्ग काढत आयसीसीने पाकिस्तानसमोर हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता. पण पीसीबीने या मॉडेलला नकार दिला तर पाकिस्तानच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते.

पाकिस्तानने जर हायब्रीड मॉडेलला नकार दिला, तर ते यजमानपद गमावू शकतात. त्यांनी यजमानपद गमावल्यास युएई किवा भारतात खेळवली जाऊ शकते. जर भारतीय संघ या स्पर्धेत नसेल तर आयसीसीसह प्रसारकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. अशामध्ये आयसीसी भारताला न खेळवण्याची चूक करणार नाही. तसे झाल्यास ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी अन्य देशात हलवली जाऊ शकते. दरम्यान, आयसीसीच्या या बैठकीत सर्व सदस्य असणार आहेत.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -