Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : IND vs NZ च्या अंतिम सामन्यात सर्वाधिक पसंती या संघाला, सट्टा बाजार तापला

Champions Trophy 2025 : IND vs NZ च्या अंतिम सामन्यात सर्वाधिक पसंती या संघाला, सट्टा बाजार तापला

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ हा न्यूझीलंड संघाशी भिडणार आहे. एकीकडे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरी गाठली, तर दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. अशामध्ये आता रविवारी, (9 मार्च) होणाऱ्या अंतिम सामन्याआधी सट्टा बाजार चांगलाच तापला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या या सट्टा बाजारात अंडरवर्ल्डपासून ते जगभरातील मोठ्या बुकमेकर्सपर्यंत सर्वजण या सामन्यावर लक्ष ठेवून आहेत, अशामध्ये आता जगभरातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Champions Trophy 2025 IND vs NZ Final international bookmakers india favorite team)

हेही वाचा : Rohit Sharma : भारतासाठी रविवार आहे घातवार, आतापर्यंत अंतिम फेरीतील 5 सामने गमावले, आज काय होणार 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत पुन्हा एकदा 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी यावेळी काय कमाल करते ? याकडे आता सर्व लक्ष ठेवून आहेत. अशामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा सट्टा लागण्याची शक्यता असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांमधील सूत्राने दिली आहे. तसेच, भारतीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय सट्टे बाजारांचा आवडता संघ असल्याचे सांगितले गेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दुबईमधील प्रत्येक मोठ्या क्रिकेट सामन्यादरम्यान देशभरातील तसेच जगभरातील मोठे बुकी एकत्र येत असतात. अधिकाऱ्यांना अशी माहिती देण्यात आली आहे की, डी-कंपनी मोठ्या क्रिकेट सामन्यांवर विशेषतः दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यांवर बारीक लक्ष ठेवून असते. दिल्लीसह देशातील अनेक बुकी दुबईतून मोठे बेटिंग नेटवर्क चालवत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, दिल्लीमधून आतापर्यंत 5 मोठ्या बुकींना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे हजारो कोटींच्या क्रिकेट सट्टेबाजीचा काळा बाजार उघड झाला.

नुकतेच, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन बुकींना अटक केली. यावेळी चौकशीदरम्यान हे बेटिंगचे कनेक्शन दिल्लीपासून थेट दुबईपर्यंत जोडल्या गेल्याचे उघड झाले. अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे 22 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय एक असिस्टंट साउंड बॉक्स (व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी), 1 लॅपटॉप, 9 मोबाईल फोन, 1 एलईडी टीव्ही आणि अनेक नोटपॅड तसेच बेटिंग स्लिपदेखील जप्त करण्यात आल्या. ही टोळी 5 मार्चला पाकिस्तानातील लाहोर येथे खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या (दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड) सामन्यावर सट्टा लावत होती. यावेळी अटक केलेल्या आरोपींनी सांगितले की, संपूर्ण नेटवर्क दुबईतून नियंत्रित केले जाते. या रॅकेटचा सूत्रधार छोटू बन्सल नावाचा एक बुकी असल्याचे सांगितले जात आहे. तो सध्या दुबईमध्येच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.