IND vs PAK दुबई : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीतील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. 2017 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमींमध्येही उत्सुकता आहे. अशात या सामन्याबाबतच्या प्रत्येक अपडेटची क्रिकेटप्रेमींकडून दखल घेतली जात आहे. त्यानुसार, नुकताच भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संभाव्य प्लेइंग 11 संघ जाहीर करण्यात आला आहे. (champions trophy 2025 india vs pakistan playing 11 of pakistan)
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीतील पकिस्तानचा हा दुसरा सामना आहे. पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध झाला असून या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीच्या उंपात्य फेरीत प्रवेश करायचा असल्यास पाकिस्तानला हा सामना जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे भारताने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. त्यामुळे हा सामना जिंकल्यास भारताच्या गुणतालिकेत वाढ होणार असून, उपांत्यफेरी गाठणं भारतासाठी सोपं होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताविरुद्ध बाबर आजाम धावा करणार की, शाहीन शाह आफ्रिदी आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणार की मोहम्मद रिजवान आपल्या कॅप्टनशिपने मॅच जिंकवणार? अशा चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये सुरू झाल्या आहेत. अशात पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11 समोर आली आहे. विशेष म्हणजे फखर जमानच्या जागी सऊद शकील न्यूझीलंड विरुद्ध ओपनिंगसाठी मैदानात उतरला होता. पण त्याने 19 चेंडूत 6 धावा केल्या. त्याच्याजागी कामरान गुलामला संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर उपकर्णधार सलमान आगा येण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड विरुद्ध त्याने 28 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. खुशदिल शाहच टीममधील स्थान कायम राहील. त्याने 49 चेंडूत 69 धावा फटकावल्या होत्या. तैयब ताहिर न्यूझीलंड विरुद्ध फ्लॉप ठरला होता. त्याला बाहेर बसवलं जाऊ शकतं. त्याच्याजागी फहीम अशरफचा संघात समावेश होऊ शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण काही वादांमुळे आणि सुरक्षेच्या कारणात्सव भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये होणार आहे. दुबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरु शकते. भारतासाठी या तिघांपैकी कुठलाही गोलंदाज धोकादायक ठरु शकतो.
पाकिस्तानची संभाव्य Playing 11
बाबर आजम, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (कॅप्टन-विकेटकीपर), सलमान अली आगा, कामरान गुलाम, फहीम अशरफ, खुशदिल शाह, हारिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि अबरार अहमद.
हेही वाचा – IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्याआधी फखर झमान बाहेर, पाकिस्तानने वरिष्ठ खेळाडूला दिली संधी