Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : टीम इंडियाला एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा, इंग्लंडच्या कर्णधाराने केली टीका

Champions Trophy 2025 : टीम इंडियाला एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा, इंग्लंडच्या कर्णधाराने केली टीका

Subscribe

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण, यजमानपद भूषविणारा पाकिस्तानचा संघच स्पर्धेबाहेर पडला आहे. अशामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यास नकार दिल्यानंतरच हायब्रीड मॉडेलने ही स्पर्धा खेळवण्यात आली. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. पण आता यामुळे भारतीय संघावर अनेक खेळाडूंनी टीका केली आहे. कारण, एकीकडे इतर संघ हे पाकिस्तानमध्ये 3 मैदानांवर खेळत असताना दुसरीकडे भारत हा एकाच मैदानावर खेळत असून त्याचा संघाला फायदा होत असल्याची टीका करण्यात येत आहे. यावरून आता इंग्लंडच्या कर्णधाराने तर ही एक अनोखी स्पर्धा असल्याचे विधान केल्याने चर्चा होत आहे. (Champions Trophy 2025 Jos Buttler on hybrid model and team india)

हेही वाचा : Harbhajan Singh : वाह, इंग्रजांची औलाद…, एक्सवर हरभजन सिंग अन् प्रेक्षकामध्ये वाद; नेमकं काय घडलं? 

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान आहे पण भारताने सुरक्षेच्या कारणास्तव तेथे खेळण्यास नकार दिला होता. असे असताना भारत त्याच ठिकाणी खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार माईक आथर्टन आणि नासेर हुसेन यांनी दुबईमध्ये भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच वेळी इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने या स्पर्धेला उपहासात्मकपणे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वर्णन एक अनोखी स्पर्धा असे केले आहे. त्यामुळे आता इतर संघांमध्येही या गोष्टीबद्दल नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामान्यापूर्वी पत्रकार परिषदेत बटलर म्हणाला, “मला वाटते की ही एक अनोखी स्पर्धा आहे, नाही का? इथे एक संघ (टीम इंडिया) दुसऱ्या जागेवर खेळत आहे.” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

कर्णधार जॉस बटलर म्हणाला की, “सध्या मला त्याबद्दल फारशी चिंता वाटत नाही. माझे पूर्ण लक्ष अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यावर असणार आहे. आम्ही यासाठी चांगली तयारी केली आहे.” इंग्लंड आणि अफगाणिस्तान बुधवारी (26 फेब्रुवारी) लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळत आहेत. ग्रुप-ब चा भाग असलेले दोन्ही संघ स्पर्धेत त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. तसेच, ग्रुप-अ मध्ये असलेले भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी बाहेर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही भारताच्या दुबईत खेळण्याबद्दल आपले मत व्यक्त केले. हायब्रिड मॉडेलनुसार खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताला दुबईतील एका ठिकाणी खेळण्याचा फायदा होत आहे. तर इतर संघांना त्यांचे गट टप्प्यातील सामने पाकिस्तानमधील वेगवेगळ्या ठिकाणी खेळावे लागत आहेत, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.