Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : पाकिस्तानचे आव्हान रमजानपर्यंत टिकले तरी खूप..., मोहम्मद हफिजचा टोला

Champions Trophy 2025 : पाकिस्तानचे आव्हान रमजानपर्यंत टिकले तरी खूप…, मोहम्मद हफिजचा टोला

Subscribe

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे आव्हान रमझानपर्यंत टिकेल की नाही, हे आज, रविवारीच निश्चित होईल. टीम इंडियाने दुबईमध्ये पाकिस्तानला पराभूत केले तर, रिझवानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडेल.

(Champions Trophy 2025) इस्लामाबाद : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज, रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याबद्दल जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या हाय-व्होल्टेज सामन्याचा मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघावर खूप दबाव आहे. कराची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा पराभव झाला. दुसरीकडे, भारताने बांगलादेशला पराभूत करून स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत एका मित्राने पाकिस्तानच्या या स्पर्धेतील भवितव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून मोहम्मद हफिज याने गमतीशीर उत्तर दिले आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Mohammad Hafeez comments on Pakistan squad)

शुभमन गिलचे शतक आणि मोहम्मद शमीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहा गडी राखून पराभव केला. सध्याच्या फॉर्मचा विचार करता, या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा आहे, यात शंका नाही. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनाही पाकिस्तानच्या विजयाबाबत साशंकताच आहे. पाकिस्तानचा संघ रमझानच्या सुरुवातीपर्यंत टिकून राहिला तरी खूप आहे, अशी टिप्पणी माजी क्रिकेटपटून मोहम्मद हफीज याने केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर, ‘मिस्टर प्रोफेसर’ मोहम्मद हाफिजने पाकिस्तानी संघाची शाळाच घेतली. कर्णधार मोहम्मद रिझवानने सामन्यादरम्यान अनेक चुकीचे निर्णय घेतले. जखमी फखर झमानला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात काहीही अर्थ नव्हता, असे पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीसंदर्भात सांगितले. तुझ्या मते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या विजयाची काय शक्यता आहे? असे मला एका मित्राने विचारले होते. त्यावर, पाकिस्तान रमझानच्या सुरुवातीपर्यंत टिकला तर त्याला खूप चांगली संधी आहे, असे गमतीशीर उत्तर त्याने दिेले.

वस्तुत:, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे आव्हान रमझानपर्यंत टिकेल की नाही, हे आज, रविवारीच निश्चित होईल. टीम इंडियाने दुबईमध्ये पाकिस्तानला पराभूत केले तर, रिझवानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडेल. त्यामुळेच मोहम्मद हफीज विनोदाने ही कोपरखळी दिली आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता फक्त परमेश्वरच त्यांना वाचवू शकतो. म्हणूनच तो म्हणाला की, पाकिस्तानने रमझानपर्यंत स्पर्धेत कसेतरी टिकून राहावे, त्यानंतर अल्लाह त्यांना पुढे घेऊन जाईल.

हेही वाचा – Narwekar about Kokate : कृषीमंत्री माणिकाराव कोकाटेंवर कारवाई कधी? राहुल नार्वेकर म्हणाले –