Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : न्यूझीलंडविरुद्ध सामान्याआधी टीम इंडियाला झटका, या खेळाडूच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह

Champions Trophy 2025 : न्यूझीलंडविरुद्ध सामान्याआधी टीम इंडियाला झटका, या खेळाडूच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह

Subscribe

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आता अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रुप अ मध्ये भारत आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत गेले असून आता ग्रुप ब मध्येही दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. अशामध्ये रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या सामान्याआधी भारतीय संघाला झटका बसला आहे. कारण, भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल हा न्यूझीलंडविरुद्ध संघात खेळण्याची शक्यता कमी झाल्या आहेत. (Champions Trophy 2025 Shubhman Gill health update)

हेही वाचा : ICC Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानची तगडी खेळी; इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर 

मिळालेल्या माहितीनुसार, सलामीवीर शुभमन गिल आजारी पडला असून तो सराव सत्रातही सहभागी झाला नाही. गिलच्या आधी ऋषभ पंत आजारी पडला होता. पण, तो आता मैदानात परतला असल्याची सांगण्यात आले आहे. सध्या भारतीय संघ हा दुबईमध्ये असून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामान्यानंतर मोठा ब्रेक भारतीय संघाला मिळाला. यामध्ये सध्या संपूर्ण संघ हा सराव करत असून तब्येतीच्या कारणास्तव बाहेर असलेल्या ऋषभ पंत पुन्हा एकदा सराव करताना दिसला. पण, फॉर्मात असलेला शुभमन गिल मात्र बुधवारी (26 फेब्रुवारी) सरावासाठी मैदानावर आला नाही. यावेळी त्याची तब्येत बरी नसल्याने तो सरावाला आला नसल्याचे सांगितले. असे असलेल तरीही बीसीसीआयने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये गिलचा समावेश होणार की नाही? याबाबत साशंकता आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल याने पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळताना शतक झळकावले होते. त्याने 129 चेंडूंमध्ये नाबाद 101 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकार मारले. यावेळी तो नाबाद राहून पहिल्या विकेटसाठी त्याने रोहित शर्मासोबत 69 धावांची भागीदारी केली होती. तर, दुसऱ्या सामन्यात त्याने 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म हा भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील सामन्याला अजूनही तीन दिवस बाकी आहेत. जर शुभमन गिल सामन्यापूर्वी बारा झाला नाही तर त्याचा अंतिम 11 मध्ये समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे आता पुढे काय होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.