Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा UEFA Champions League : चेल्सी, पॅरिसचा उपांत्य फेरीत प्रवेश 

UEFA Champions League : चेल्सी, पॅरिसचा उपांत्य फेरीत प्रवेश 

चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठण्याची ही चेल्सीची २०१४ नंतर पहिलीच वेळ ठरली.

Related Story

- Advertisement -

चेल्सी आणि पॅरिस सेंट जर्मान या संघांनी युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांनी आपले दुसऱ्या लेगमधील (परतीची लढत) सामने गमावले. असे असतानाही त्यांना स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. चेल्सीने उपांत्यपूर्व फेरीत एफसी पोर्टोचा दोन लेगमध्ये मिळून २-१ असा पराभव केला. मेसन माऊंट आणि बेन चिलवेलच्या गोलमुळे चेल्सीने पहिल्या लेगमधील सामना २-० असा जिंकला होता. दुसऱ्या लेगमध्ये चेल्सीचा संघ ०-१ असा पराभूत झाला. मात्र, उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना पहिल्या लेगमधील विजय पुरेसा ठरला. चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठण्याची ही चेल्सीची २०१४ नंतर पहिलीच वेळ ठरली.

त्या पराभवाची पॅरिसने केली परतफेड

- Advertisement -

पॅरिस आणि गतविजेत्या बायर्न म्युनिकमधील उपांत्यपूर्व फेरीची लढत चुरशीची झाली. बायर्नच्या मैदानावर झालेला पहिल्या लेगचा सामना पॅरिसने ३-२ असा जिंकला होता. तर दुसऱ्या लेगमध्ये बायर्नने १-० अशी बाजी मारली. त्यामुळे दोन लेगच्या अंती संघांमध्ये ३-३ अशी बरोबरी होती. परंतु, प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अधिक गोल मारल्याने पॅरिसने ही लढत जिंकत उपांत्य फेरी गाठली. मागील वर्षी या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला, ज्यात बायर्नने बाजी मारली होती. त्या पराभवाची पॅरिसने परतफेड केली.

- Advertisement -