हजार्डच्या गोलमुळे चेल्सी विजयी

काराबाओ कपच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात चेल्सीने लिव्हरपूलचा २-१ असा पराभव केला. या सामन्यात चेल्सीचा स्टार खेळाडू इडन हजार्डने अप्रतिम गोल केला.

सौजन्य - Goal.com

स्टार खेळाडू इडन हजार्डने केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर काराबाओ कपच्या तिसऱ्या फेरीत चेल्सीने लिव्हरपूलचा २-१ असा पराभव केला. त्यामुळे चेल्सीने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे.

असा झाला सामना

इंग्लंडमधील या दोन बलाढ्य संघांच्या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध पावित्रा घेतला. त्यामुळे सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. तर मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आक्रमक सुरूवात केली. सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला डॅनियल स्टरीजने गोल करत लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी त्यांना फार काळ टिकवून ठेवता आली नाही. ७९ व्या मिनिटाला चेल्सीच्या इमर्सन पाल्मिरीने गोल करत चेल्सीला बरोबरी करवून दिली. हा सामना अतिरिक्त वेळेत जाईल असे वाटत असतानाच इडन हजार्डने आपली जादू दाखवली. त्याने ८५ व्या मिनिटाला अप्रतिम गोल करत चेल्सीला विजय मिळवून दिला.

हजार्डचा अप्रतिम गोल 

या सामन्याच्या ८५ व्या मिनिटाला इडन हजार्डने अप्रतिम गोल करत चेल्सीला २-१ असा विजय मिळवून दिला. त्याने दोन खेळाडूंच्या पायातून बॉल काढला आणि जोरदार शॉट मारत गोल केला.