Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा यंगस्टार क्रिकेट क्लबचा ६ विकेट्सने पराभव करत चेंबूर जिमखान्याने जिंकला 'बापट करंडक'

यंगस्टार क्रिकेट क्लबचा ६ विकेट्सने पराभव करत चेंबूर जिमखान्याने जिंकला ‘बापट करंडक’

Subscribe

चेंबूर जिमखान्याने ठाण्याच्या यंगस्टार क्रिकेट क्लबचा सहा विकेट्सनी पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित बापट करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

मुंबई | चेंबूर जिमखान्याने (Chembur Gymkhana) ठाण्याच्या यंगस्टार क्रिकेट क्लबचा (Youngster Cricket Club) सहा विकेट्सनी पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब (Kurla Sports Club) आयोजित बापट करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. यंगस्टार क्रिकेट क्लबने दिलेले १३५ धावांचे आव्हान चेंबूर जिमखान्याने १९.४ षटकात ४ फलंदाज गमावून १३८ धावांसह पार करत २०१२-१३ नंतर पुन्हा एकदा बापट करंडकावर (Bapat Karandak) नाव कोरले.

प्रथम फलंदाजी करताना यंगस्टार क्रिकेट क्लबने २० षटकात ७ बाद १३५ धावसंख्या उभारली. अजित पेहलवानने ३७, सागर शाहने २६, फैजल मुकादमने १७ धावा केल्या. आयुष बिडवई आणि दिनेश साळुंखेने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. अमन यादवने एक फलंदाज बाद केला.

- Advertisement -

त्यानंतर गोलंदाजीत छाप पडणाऱ्या दिनेश साळुंखेने नाबाद ४५ धावांची खेळी करत संघाला विजयाचा मार्ग मोकळा केला. आर्यन कपूरने ३०, केतन नेमाडेने २९ आणि आयुष बिडवईने २३-धावांचे योगदान संघाच्या विजयात दिले. जितेश टंक, अनिकेत क्षिरसागर,सूरज लालवानी, अमित राठोड यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. पारितोषिक वितरण समारंभात जेष्ठ क्रिकेटपटू, प्रशिक्षक नागेश ठाकूर यांना १५ व्या जी.एस.वैद्य जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : यंगस्टार क्रिकेट क्लब : २० षटकात ७ बाद १३५ ( अजित पेहलवान ३७, सागर शाह २६, फैजल मुकादम १७, आयुष बिडवई ४-१७-२, दिनेश साळुंखे ४-३०-२, अमन यादव ४-३२-१) पराभूत विरुद्ध चेंबूर जिमखाना १९.४ षटकात ४ बाद १३८ ( दिनेश साळुंखे नाबाद ४५, आर्यन कपूर ३०, केतन नेमाडे २९, आयुष बिडवई २३, जितेश टंक ३-१२-१, अनिकेत क्षिरसागर ३-१७-१, सूरज लालवानी ३-२२-१, अमित राठोड २-१२-१).

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -