घरक्रीडाChhatrasal Murder Case : सुशील कुमारची रेल्वेच्या नोकरीतून हकालपट्टी; पद्म पुरस्कारही काढून...

Chhatrasal Murder Case : सुशील कुमारची रेल्वेच्या नोकरीतून हकालपट्टी; पद्म पुरस्कारही काढून घेणार? 

Subscribe

सागर धनकर हत्येप्रकरणी सुशीलला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

युवा कुस्तीपटू सागर धनकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला उत्तर रेल्वेने त्याच्या पदावरून निलंबित केले आहे. सुशील उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून काम करत होता. दिल्ली सरकारने शालेय स्तरावरील खेळाच्या विकासासाठी त्याची छत्रसाल स्टेडियमवर ओएसडी (Officer on Special Duty) पदावर नियुक्ती केली होती. परंतु, आता त्याला उत्तर रेल्वेने त्याची पदावरून हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी दिली. सागर धनकर हत्येप्रकरणी सुशीलला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

पद्म पुरस्कारही काढून घेणार? 

सुशीलला उत्तर रेल्वेने त्याच्या पदावरून निलंबित केले असून आता त्याच्याकडून पद्म पुरस्कारही काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या सुशीलला २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, त्याच्यावर हत्येचा आरोप असल्याने सरकार कठोर पाऊल उचलून त्याच्याकडून हा पुरस्कार काढून घेऊ शकेल. परंतु, याआधी एखाद्या पद्म पुरस्कार विजेत्या खेळाडूवर हत्येचा आरोप झाल्याचे उदाहरण नसल्याने सरकार कोणताही निर्णय घेण्याआधी बराच विचार करणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

सुशीलला रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर ४ मे रोजी झालेल्या मारहाणीमध्ये २३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनकर जखमी झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर सुशील आणि त्याचा साथीदार अजय कुमार जवळपास तीन आठवडे फरार होते. त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी इमानही जाहीर केले होते. अखेर रविवारी त्यांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -