Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा यशामागे लहानपणापासूनची मेहनत!

यशामागे लहानपणापासूनची मेहनत!

Related Story

- Advertisement -

वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने तिसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशचा पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. १७५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २ बाद ११० असा सुस्थितीत होता. मात्र, दीपकने आपली जादू चालवत अवघ्या ७ धावांच्या मोबदल्यात हॅट्ट्रिकसह ६ विकेट्स घेत भारताला हा सामना जिंकवून दिला. ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली. या मालिकेत भारताचे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार खेळले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत अधिक जबाबदारीने गोलंदाजी करत दीपकने ३ सामन्यांत ८ बळी घेतले. त्यामुळे त्याला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. मला आता मिळत असलेल्या यशामागे लहानपणापासूनची मेहनत आहे, असे सामन्यानंतर दीपकने सांगितले.

मी अशी कामगिरी करू शकेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. मी लहानपणापासून खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचेच मला फळ मिळत आहे. मला महत्त्वाची षटके देण्यात येतील याची रोहितने आधीच कल्पना दिली होती आणि संघ व्यवस्थापनाला तेच हवे होते. तुला मी आज बुमराहप्रमाणे वापरणार आहे, असे रोहितने मला सांगितले होते. त्याने इतका विश्वास दाखवल्याचा मला आनंद आहे. संघ दबावात असताना गोलंदाजी करायला मला आवडते. माझ्यावर जेव्हा कोणी विश्वास दाखवत नाही, तेव्हा वाईट वाटते. कर्णधाराने विश्वास दाखवल्याने माझा आत्मविश्वास वाढला, असे दीपक म्हणाला.

- Advertisement -

जसप्रीत बुमराह हा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याने त्याच्याशी तुलना होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही दीपकने सांगितले. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज असून त्याच्याशी तुलना होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. माझी त्याच्याशी स्पर्धा नाही. चांगली गोलंदाजी करणे हे माझे काम आहे, असे दीपकने स्पष्ट केले.

आयपीएलमध्ये चेन्नईत खेळल्याचा फायदा!

- Advertisement -

दीपक चहरने आयपीएलच्या मागील दोन मोसमांत चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. चेन्नईकडून चेन्नईमध्ये खेळल्याचा मला खूप फायदा झाला आहे, असे दीपकने सांगितले. चेन्नईमध्ये खेळल्याचा मला खूप फायदा झाला आहे. चेन्नईमध्ये दव पडते आणि उष्ण हवेमुळे खूप घाम येतो. त्यामुळे मी चुका केल्या आहेत आणि नो-बॉल टाकले आहेत. मात्र, या चुकांमधून मी शिकलो आहे, असे दीपक म्हणाला.

- Advertisement -