chinese player peng shuai : लैंगिक छळाच्या आरोपाबद्दल टेनिस स्टार खेळाडू पेंग शुईने बदललं विधान

चीनची टेनिस स्टार पेंग शुई हिने तिच्यावरील शारीरिक शोषणाच्या जुन्या आरोपांवरून माघार घेतली आहे. शेईने फ्रेंच
वृत्त पत्राला दिलेल्या माहितीनुसार चिनी अधिकाऱ्यांविरोधात कधीही लैंगिक छळाचे आरोप लावले नाहीत आणि जगभरातील सर्वच लोकांना त्यांच्याबाबत मोठा गैरसमज पसरल्याचे परिणाम आहेत. ल एक्विप या फ्रेंच क्रिडा वृत्तपत्रामधून त्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या मुलाखतीत त्यांनी लैंगिक छळाच्या आरोपांबाबत आणि चिनी सरकारचा दबाव यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली नाहीत. पेंग शुईने सांगितलं की, लैंगिक छळाबाबत मी कधीच वक्तव्य केलेलं नाहीये. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. ही पोस्ट यापुढे गृहीत धरू नये. ती पोस्ट पेंगच्या अकाऊंटवरून ताबोडतोब काढण्यात आली.

भावना, खेळ आणि राजकारण हे सर्व वेगवेगळं आहे. माझे वैयक्तिक आयुष्य आणि समस्यांचं राजकारणात समावेश करू नये. नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या पोस्टनंतर आयुष्य कसे होते, याबाबत वृत्तपत्राने प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, जसे व्हायला हवे, तसं ते नाहीये.

काय आहे प्रकरण?

शुई मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत राहिली होती. कारण पेंग शुईने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या एका अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर ती अचानक गायब झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला टेनिस महासंघासह अनेक खेळाडूंनी तिच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र हे प्रकरण वाढत असताना पेंग शुईने ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्याशीही चर्चा केली होती.


हेही वाचा : देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल