Peng Shuai: टेनिसपटू पेंग शुआई बेपत्ता, थेट संवाद नाही

chinese tennis player peng shuai missing
Peng Shuai: टेनिसपटू पेंग शुआई बेपत्ता, थेट संवाद नाही

चीनमधील स्टार टेनिसपटू गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिच्याशी थेट संवाद झाला नाही. यामुळे पेंग सुरक्षित असल्याची खात्री पटल्याशिवाय चीनमध्ये टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात येणार नाही असे महिला टेनिस संघटनेकडून सांगण्यात आले आहे. पेंग शुआईने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. पेंगने सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी उप-उच्चाधिकारी झांग गाओली यांच्यावर लैंगिक आत्याचार केले असल्याचा आरोप केला आहे.

वरिष्ठ नेत्यावर केलेल्या आरोपानंतर पेंग शुआई अचानक बेपत्ता झाली आहे. त्यामुळे आता ती सुरक्षित असल्याचे कळल्याशिवाय चीनमध्ये महिलांच्या टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात येणार नाही. असे महिला टेनिस संघटनचे अध्यक्ष स्टिव्ह सायमन यांनी म्हटलं आहे. दरम्यान वाढत्या दबावामुळे चीनी संघटनेने पेंग शुआई सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. परंतु महिला टेनिस संघनेचा विश्वास बसत नाही आहे. चिनी संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, पेंग सुरक्षित आहे. ती लवकरच सगळ्यांसमोर येईल.

सोशल मीडियामधून वाढत्या दबावानंतर चीनी मीडियाकडून पेंग शुआईचे दोन व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. यातील एका व्हिडिओत पेंग टेनिसच्या सामन्यात दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका हॉटेलमध्ये दिसत आहे. हॉटेलच्या व्हिडिओमध्ये पेंग आनंदात असून जेवण करताना दिसत आहे. दरम्यान पेंग शुआई सुरक्षित असून ती प्रशिक्षकांसोबत चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पेंग शुआईने काही दिवसांपुर्वी सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यावर लैंगिक अत्याचार केल्याची आरोप केले आहेत. यामुळे चिनी सरकारच्या सांगण्यावरुन पेंगचे अपहरण तर करण्यात आले नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पेंग शुआईवरुन लक्ष विचलित करण्यासाठी तिच्या अधिकृत इमेल आयडीवरुन आपण सुरक्षित असल्याचा मेल आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु पेंग शुआई कुठे आहे याचा अद्याप पत्ता लागला नाही.


हेही वाचा : पी.व्ही सिंधूनंतर किदाम्बी श्रीकांतचा पण उपांत्य फेरीत पराभव; भारताचे आव्हान संपुष्टात