घरक्रीडाओम साईश्वर मंडळ, सरस्वतीची विजयी सलामी

ओम साईश्वर मंडळ, सरस्वतीची विजयी सलामी

Subscribe

चिंतामणी चषक खो-खो स्पर्धा

ओम साईश्वर मंडळ, सरस्वती या संघांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक खो-खो स्पर्धेतील ज्युनियर मुलींच्या गटात विजयी सलामी दिली. तसेच पुरुष गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील चुरशीच्या सामन्यात ओम साईश्वर मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा ६-५ असा पराभव केला. त्यांच्या विजयात भूपेश गायकवाड (३:१०, नाबाद १:४० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) चमकला.

लालबाग येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील ज्युनियर मुलींच्या (अठरा वर्षांखालील) सलामीच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने विजय क्लबचा ७-४ असा तीन गुणांनी पराभव केला. आर्या तावडे (३:००, २:१० मिनिटे संरक्षण), वैष्णवी परब (नाबाद २:३०, २:१० मिनिटे संरक्षण), अथश्री तेरवणकर (२:५० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) यांनी ओम साईश्वरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

याच गटात माहिमच्या सरस्वती कन्या संघाने अमरहिंदचा ९-५ असा एक डाव आणि चार गुणांनी पराभव केला. सरस्वतीच्या संजना डोंगरे (२:५० मिनिटे संरक्षण), नताशा नतापे (नाबाद २:२० मिनिटे संरक्षण), संस्कृती भुजबळ (४:४० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी) या खेळाडू चांगल्या खेळल्या.

ज्युनियर मुलांच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने युवक क्रीडा मंडळावर १३-७ अशी एक डाव आणि सहा गुणांनी मात केली. प्रतीक घाणेकरने (३:५० मिनिटे संरक्षण), शुभम शिंदे (२:३० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), सम्यक जाधव (नाबाद १:४०, २:५० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) यांच्या खेळामुळे विद्यार्थी संघाने विजय संपादला.

- Advertisement -

ओम समर्थ उपांत्यपूर्व फेरीत

महिला गटातील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दादरच्या ओम समर्थ भारत व्यायाममंदिराने कीर्ती ठाकूरच्या (३:५० मिनिटे संरक्षण आणि ३ बळी) खेळाच्या जोरावर एस.एन.डी.टी विद्यालयाचा १८-३ असा एक डाव आणि १५ गुणांनी धुव्वा उडवला. वैभव स्पोर्ट्स क्लबने परळच्या आर्यसेना संघावर ६-२ अशी मात केली. त्यांच्याकडून मानसी आंबोकरने (२:३०, नाबाद ५:०० मिनिटे संरक्षण) उत्तम खेळ केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -