घरक्रीडाख्रिस गेलकडून टॉप ३ T-20 क्रिकेटर्सला पसंती, यूनिव्हर्स बॉसच्या यादीत भारतीय...

ख्रिस गेलकडून टॉप ३ T-20 क्रिकेटर्सला पसंती, यूनिव्हर्स बॉसच्या यादीत भारतीय खेळाडूचा समावेश

Subscribe

संपूर्ण जगात यूनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने टॉप – ३ मध्यल्या टी-२० क्रिकेटरची निवड केली आहे. परंतु यामध्ये स्वत:चा समावेश करून घेतलेला नाहीये. कॅरेबियन संघाचा माजी कर्णधार आणि वेगवान फलंदाज ख्रिस गेलची टी-२०सामन्यांमध्ये दहशत आहे म्हणजेच त्याच्या अधिक समावेश आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सर्वात जास्त शतक आणि धावा बनवण्याचा करिश्मा त्याने केला आहे. मात्र, यूनिव्हर्स बॉसच्या यादीमध्ये तीन क्रिकेटर्सच्या नावांचा सहभाग देखील आहे. क्रिकेट वेबसाईट ईएसपीएन क्रिकेइंफो केलेल्या संवादानुसार, ख्रिस गेलने पहिल्या स्थानावर निकोलसला ठेवलं आहे. संपूर्ण जगभरात टी-२० मध्ये त्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जाते.

क्रिकेट जगतात ख्रिस गेलला एक स्टार म्हणून ओळखले जाते. आयपीएलमध्ये गेलने पंजाब किंग्ज टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. यूनिव्हर्स बॉसने आपल्या दुसऱ्या पसंतीच्या क्रिकेटरमध्ये आंद्रे रसलचं नाव घेतलं आहे. कारण आंद्रे रसल अनेक वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्सचा एक भाग आहे. तो दुनियातील सर्वात भयानक खेळाडू समजला जातो. त्याशिवाय गेलने आपल्या तिसऱ्या फेव्हरेट क्रिकेटरचं नाव घेतलं आहे. हा तिसरा क्रिकेटर भारतीय संघातून आहे. या भारतीय क्रिकेटरचं नाव हिटमॅन रोहित शर्मा असं आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत चार शतकं झळकावली आहेत. तसेच रोहित आता भारतीय संघाच्या टी-२० सामन्याचा कर्णधार आहे.

- Advertisement -

होम ग्राऊंडवर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा

यूनिव्हर्स बॉसची इच्छा आपल्या होम ग्राऊंडवर शेवटचा सामना खेळण्याची आहे. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. याआधी टी-२० विश्वकपच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध सामना खेळण्यासाठी जेव्हा तो मैदानाबाहेर आला होता. त्यावेळी त्याने आपले दोन्ही हाथ हवेत फिरवले होते. त्याचे ग्लव्स सुद्धा त्याच्या चाहत्यांना आवडले होते. गेल्या काही दिवसांसाठी असं वाटत होतं की, गेलने शेवटचा सामना खेळला आहे.

परंतु गेल म्हणाला की, मी अजूनही क्रिकेटमधून संन्यास घेतलेला नाहीये. मी माझी शेवटची होम ग्राऊंडवर खेळू इच्छितो. यासाठी गेलने क्रिकेट वेस्टइंडीचसोबत चर्चा देखील केली आहे. त्यामुळे त्याला आशा आहे की, आयर्लंड विरूद्ध फेअरवेल म्हणजेच शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळावी.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव टी-२० सामना हा ख्रिस गेलचा शेवचा व आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो. वेस्ट इंडिज व आयर्लंड यांच्यात ८ ते १६ जानेवारी दरम्यान, तीन एकदिवसीय सामने आणि एक दिवसीय सामना जमैकामधील सबिना पार्कमध्ये खेळवला जाणार आहे.


हेही वाचा: India-Russia summit : भारत-रशियामध्ये बैठकीत राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला चीनचा मुद्दा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -