घरक्रीडाIND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा...

IND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा खेळाडू

Subscribe

ख्रिस मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी, 42 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 12, 48 आणि 34 विकेट घेतल्या आहेत आणि 173, 467 आणि 133 धावा केल्या आहेत.

आयपीएल दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचे जाहीर केलं आहे. इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) 2022 चे मेगा ऑक्शन पुढील महिन्यात होणार आहे. यापुर्वीच मॉरिसने घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयपीएल २०२१ च्या हंगामात मॉरिस महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने मॉरिससाठी 16.5 कोटी रुपये खर्च केले होते. येणाऱ्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या टी20 टीम टायटन्सच्या संघाचा प्रशक्षिकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. ख्रिस मॉरिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे.

ख्रिस मॉरिसने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलं आहे. मॉरिस म्हणाला की, आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचा आभारी आहे. हा प्रवास खूप मजेशीर होता. तसेच टायटन्ससाठी प्रशिक्षकपदाची भूमिका स्वीकारताना मला आनंद होत असल्याचे ख्रिस मॉरिसने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chris Morris (@tipo_morris)

- Advertisement -


ख्रिस मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी, 42 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 12, 48 आणि 34 विकेट घेतल्या आहेत आणि 173, 467 आणि 133 धावा केल्या आहेत. मॉरिसने मार्च 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ख्रिस मॉरिसने आयपीएलमध्ये एकूण 81 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्यानावे 95 विकेट आहेत. तसेच एकूण 618 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या कारकिर्दीत 35 षटकार लगावले आहेत. आयपीएल २०२१ मध्ये ख्रिस मॉरिस सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने या हंगामात एकूण १५ गडी बाद केले आहेत.


हेही वाचा : Novak Djokovic : न्यायालयीन लढाई जिंकत नोवाक जोकोविच दिसला टेनिस कोर्टात, न्यायाधीशांचे आभार, म्हणाला…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -