Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 Auction: क्रिस मॉरिस ठरला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू 

IPL 2021 Auction: क्रिस मॉरिस ठरला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू 

मॉरिसला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे.

Related Story

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला तब्बल १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले आहे. मॉरिसला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूही उत्सुक होते. परंतु, अखेरीस त्याला राजस्थानने खरेदी केले. मॉरिसची मूळ किंमत (बेस प्राईज) ७५ लाख इतकी होती. परंतु, राजस्थानने त्याच्यासाठी तब्बल १६.२५ कोटी रुपये खरेदी केले. मॉरिस मागील मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला होता. परंतु, आरसीबीने त्याला रिटेन केले नव्हते. याचा त्याला आता फायदा झाला असून राजस्थानने त्याला मोठ्या किमतीत खरेदी केले आहे.

मागील वर्षी ११ विकेट

- Advertisement -

मॉरिसने आतापर्यंत आयपीएलमध्ये ७० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १५७.८७ च्या स्ट्राईक रेटने ५५१ धावा केल्या आहेत. तसेच त्याला ८० विकेट घेण्यातही यश आले आहे. मॉरिस याआधी चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, राजस्थान आणि आरसीबी या संघांकडून खेळला आहे. मागील वर्षी आरसीबीने त्याला १० कोटी रुपयांत खरेदी केले होते. या संघाकडून खेळताना त्याने ९ सामन्यांत ११ विकेट घेतल्या होत्या. परंतु, आरसीबीने त्याला पुन्हा करारबद्ध केले नाही. आता तो राजस्थान संघाकडून खेळणार असून संजू सॅमसन यंदा या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.


हेही वाचा – ग्लेन मॅक्सवेलची चांदी; ‘या’ संघाने केले १४.२५ कोटीत खरेदी


- Advertisement -

 

- Advertisement -