घरक्रीडासांगलीच्या संकेतला सरकारकडून 30 लाखांचे बक्षीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

सांगलीच्या संकेतला सरकारकडून 30 लाखांचे बक्षीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Subscribe

बर्मिंममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्ये त्यांने 55 कीलोग्रॅम वजनी प्रकारात त्यांने ही कामगिरी केली. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. संकेत सरगरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून बंक्षीस जाहीर केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत –

- Advertisement -

सांगलीच्या संकेतने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्याच्या कामगिरीची जगभरात चर्चा आहे. त्याने त्यासाठी घेतलेले कष्ट आणि खेळासाठी केलेल प्रयत्न देखील मोठे आहेत. त्यांच्या कामगिरीसाठी त्याला तीस लाख तर त्याच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख रुपयांचे बक्षीस राज्य सरकारकडून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर केले.

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत विक्रम –

- Advertisement -

21 वर्षीय संकेतच्या नावावर सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत 256 किलोग्रॅम वजन उचलण्याचा विक्रम आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर त्यांने अनेकदा पदके मिळवली आहेत. संकेत हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा इतिहासाचा विद्यार्थी आहे. त्याने खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -