Eco friendly bappa Competition
घर क्रीडा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अखेरचा दिवस; भारताला किती 'सुवर्ण' मिळू शकतात, पाहा संपूर्ण...

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अखेरचा दिवस; भारताला किती ‘सुवर्ण’ मिळू शकतात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक

Subscribe

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. आक्रमक खेळी करत या खेळाडूंनी प्रतिस्पर्धींना चांगलीच टक्कर दिली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून पदकांची कमाई करण्यास सुरूवात केली होती. आज या स्पर्धेचा अखेरचा दिवस आहे. तसेच, राष्ट्रकुल स्पर्धेचा पदकतालिका सुरधारण्यासाठी भारतीय खेळाडू शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी भारत किती सुवर्णपदकं पटकावू शकतो हे, जाणून घेऊयात. (commonwealth games 2022 last day india full schedule in cwg birmingham)

आतापर्यंत 10 दिवसांच्या खेळात भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर 18 सुवर्ण पदकांसह एकूण 55 पदके जिंकली आहेत. आजा या खेळाच्या शेवटच्या दिवशी भारताला बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि हॉकीमधून पदकाची आशा आहे. दरम्यान, भारतासाठी हे राष्ट्रकुल खेळ आतापर्यंत वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये उत्कृष्ट ठरले आहेत.

- Advertisement -

अपेक्षेप्रमाणे सर्व खेळाडूंनी कामगिरी करत देशासाठी पदके जिंकली आहेत. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीही भारतीय खेळाडूंच्या नजरा सुवर्ण पदकावर असणार आहेत. हॉकीमध्ये पुरुष संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्याचवेळी दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू देशाच्या झोळीत सुवर्णपदक टाकण्याच्या इराद्याने बॅडमिंटन एकेरीत उतरणार आहे.

आजच्या सामन्यांचे वेळापत्रक

- Advertisement -

बॅडमिंटन :

  • महिला एकेरी सुवर्णपदक सामना (पीव्ही सिंधू) : दुपारी 1:20
  • पुरुष एकेरी सुवर्णपदक सामना (लक्ष्य सेन) : दुपारी 2:10 वाजता
  • पुरुष दुहेरी सुवर्णपदक सामना (सात्विक साईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी) : दुपारी ३:०० वाजता

हॉकी :

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी फायनल (PM 5:00)

टेबल टेनिस :

  • पुरुष एकेरीचा कांस्यपदक सामना : जी साथियान दुपारी 3:35 वाजता
  • पुरुष एकेरीचा सुवर्णपदक सामना : अचंता शरथ कमल दुपारी 4:25 वाजता

समारोप समारंभ :

  • भारतीय वेळेनुसार रात्री 00:30 पासून

हेही वाचा –  CWG 2022 : ऑस्ट्रेलियाचा ‘सुवर्ण’ विजय, तर भारतीय संघ ठरला रौप्यपदकाच्या मानकरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -