भारताची स्टार धावपटू धनलक्ष्मीची डोप चाचणी पॉझिटिव्ह

बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची स्टार धावपटू धनलक्ष्मीची डोप चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची स्टार धावपटू धनलक्ष्मीची डोप चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भारतीय ऍथलेटिक संघ १०० मीटर रिलेमध्ये पदक जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. (commonwealth games setback for india as dhanalaxmi test possitive in dope test)

मिळालेल्या माहितीनुसार, डोप चाचणीसाठी एआययूने धनलक्ष्मीच्या नमुन्यांची तपासणी केली होती. त्या तपासणीमध्ये धनलक्षनीच्या नमुन्यात स्टेरॉईड आढळले आहेत. त्यामुळे धनलक्ष्मीवर सध्या बंदी घालण्यात आली असून ती राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

त्याशिवाय धनलक्ष्मीला युगेन येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, धनलक्ष्मीने गेल्या वर्षी १०० मीटर शर्यतीत दुती चंदला पराभूत केले होते. त्याशिवाय धनलक्ष्मीने गेल्या महिन्यात २०० मीटरमध्ये हिमा दासचाही पराभव केला आहे.

धनलक्ष्मीने गेल्या वर्षी भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. ४०० मीटर रिले शर्यतीत हिमा दास आणि दुती चंद यांच्यासह धनलक्ष्मीचा संघात समावेश होता. धनलक्ष्मी 100 मीटर प्रकारात रिले शर्यतीव्यतिरिक्त भारताकडून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार होती.

धनलक्ष्मी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला रवाना झालेली नाही. चॅम्पियनशिपच्या आयोजकांनी धनलक्ष्मीचे नाव काढून टाकल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच धनलक्ष्मी डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने तिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा – आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या मंजिरी भावसारला कांस्यपदक