घरक्रीडामाझ्यावर झालेले जातीयवादाचे आरोप गंभीर, पण तथ्यहीन - वसिम जाफर 

माझ्यावर झालेले जातीयवादाचे आरोप गंभीर, पण तथ्यहीन – वसिम जाफर 

Subscribe

मला या आरोपांमुळे मानसिक त्रास झाल्याचे जाफरने सांगितले.

भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने नुकताच उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. जाफरवर संघनिवड करताना जातीयवाद करत मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचे आरोप करण्यात आले होते. माझ्यावर झालेले हे आरोप गंभीर आहेत, पण त्यात जराही तथ्य नसल्याचे जाफरने स्पष्ट केले. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने गुरुवारी जाफरला समर्थन दर्शवले आहे. ‘खेळाडूंना तुझे मार्गदर्शन मिळणार नाही याचे दुःख आहे,’ असेही कुंबळे म्हणाला. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव माहीम वर्मा आणि संघ व्यवस्थापक नवनीत मिश्रा यांनी जाफरवर हे गंभीर आरोप केले होते. मला या आरोपांमुळे मानसिक त्रास झाल्याचे जाफरने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

नव्या खेळाडूंना संधी द्यायची होती

माझ्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. माझ्यावर संघनिवड करताना जातीयवाद केल्याचा आरोप झाल्याचे खूप दुःख आहे. मात्र, हे आरोप तथ्यहीन आहेत. फलंदाजीचा क्रम ठरवताना मला बरेच सल्ले दिले गेले. परंतु, मी ते मान्य केले नाहीत. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मी ज्या खेळाडूंना संधी दिली, त्यांच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास होता. मी जर जातीयवाद करत असतो आणि मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असतो, तर समद फल्लाह आणि मोहम्मद नझीम यांना संघातून वगळले असते का? मला नव्या खेळाडूंना संधी द्यायची होती, असे जाफरने स्पष्ट केले.

- Advertisement -

मौलवींना मी निमंत्रण दिले नाही

क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याच्या वेळेत जाफर यांनी मौलवींना बोलावले होते. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात सक्षम नसल्याचा आरोपही जाफरवर झाला. मात्र, जाफरने या आरोपांचे खंडन केले आहे. शुक्रवारी मौलवी आले होते, पण त्यांना मी नाही तर इकबाल अब्दुल्लाने निमंत्रण दिले होते. त्यामुळे माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे जाफर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -