Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ICC T20I WORLD CUP 2021 : धोनी विरोधात "बीसीसीआय" कडे तक्रार

ICC T20I WORLD CUP 2021 : धोनी विरोधात “बीसीसीआय” कडे तक्रार

निवडीनंतर अडचणीत वाढ होण्याची शकतात

Related Story

- Advertisement -

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनी विरोधात गुरुवारी बीसीसीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अडचणीत वाढ होण्याची शकतात दर्शवली जात आहे. धोनीवर हित संबंधाच्या संघर्षाचा आरोप म्हणजेच कॉनफ्लिक्ट ऑफ इन्ट्रेस्टच्या नियमांअंतर्गत आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए) चे माजी सदस्य इंदौरचे संजीव गुप्ता यांनी धोनी विरुध्द बीसीसीआयच्या ॲपेक्स कौन्सिलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

लोढा समितीच्या नियमांचा संदर्भ देत गुप्ता म्हणाले की, कोणतीही व्यक्ती एकाच वेळी दोन पदे धारण करू शकत नाही. अशा स्थितीत धोनीला टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवणे हे नियमांचे उल्लंघन आहे. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे आणि आगामी टी -२० विश्वचषकासाठी त्याला टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून बुधवारी बीसीसीआयने घोषित केले आहे.

- Advertisement -

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, “होय, गुप्ता यांनी सौरव गांगुली आणि जय शाह यांच्यासह सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांना तक्रार पाठवली आहे. त्यांनी हे पत्र बीसीसीआयच्या घटनेच्या कलम ३८ (४) चा संदर्भ देऊन लिहिले आहे, त्यानुसार एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही. आता सर्वोच्च परिषद यासंदर्भात आपल्या न्यायिक संघाशी चर्चा करेल.

धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, भारताने त्याच्या कर्णधार पदाखाली दोन विश्वचषक जेतेपदं जिंकली आहेत. २००७ दक्षिण आफ्रिकेत टी -२० विश्वचषक आणि भारतात २०११ एकदिवसीय विश्वचषक.

- Advertisement -

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी टी -२० वर्ल्ड कपचे पहिले जेतेपद पटकावण्यात यशस्वी झाला. विश्वचषक, क्रिकेटचे सर्वात लहान स्वरूप, २००७ साली सुरू झाले, तेव्हा तरुणांनी सजलेल्या भारतीय संघाने ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी -२० विश्वचषक जिंकला होता. ४० वर्षीय धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटरमधून निवृत्ती घेतली होती. २०१९ च्या विश्वचषक सेमीफायनलमध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला. असे मानले जाते की मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी रणनीती आखण्याचा त्याचा अनुभव पाहता त्याची या भूमिकेसाठी निवड झाली आहे. त्याला महत्त्वाची आयसीसी स्पर्धा कशी जिंकता येईल हे माहित आहे. कोहलीला आयसीसी स्पर्धांचा फारसा अनुभवी नाही यासाठीच महेंद्रसिंग धोनीही मेंटर (मार्गदर्शक) म्हणून संघासोबत सामील.


हेही वाचा : ENG VS IND 5TH TEST : भारतीय संघाला मोठा धक्का, आणखी एकाला कोरोनाची लागण

“दादा” झळकणार बॉलीवूड पडद्यावर, गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

- Advertisement -