Eco friendly bappa Competition
घर क्रीडा ऐतिहासिक कामगिरीबद्दल 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव

ऐतिहासिक कामगिरीबद्दल ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव

Subscribe

नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा आता वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. भारताचा स्टार अॅथलिट नीरज चोप्राने रविवारी जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे. या विजयासह, तो World Athletics Championshipsमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश आहे.

- Advertisement -

प्रतिभावान नीरज चोप्राने उत्कृष्ट कामगिरीचे आणखी एक उदाहरण दिले आहे. त्याचे समर्पण, अचूकता आणि तीव्र इच्छाशक्ती यामुळे तो केवळ अॅथलेटिक्समध्ये चॅम्पियन बनला नाही तर संपूर्ण क्रीडा जगतात अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक बनला आहे. World Athletics Championshipsमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुडापेस्ट येथील World Athletics Championshipsमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन केले. भारतीय Athleticsच्या गोल्डन बॉयने World Athletics Championshipsमध्ये पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. तुझ्या या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे आणि हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात नेहमीच स्मरणात राहील, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नीरजने इतिहास रचला
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही भारताच्या गोल्डन बॉयचे अभिनंदन केले आहे. नीरज चोप्राने इतिहास रचला आणि त्याने पुन्हा एकदा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. World Athletics Championships 2023मध्ये पुरुषांच्या भालाफेकचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन, असे किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून अभिनंदन
सुवर्णपदक जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाने नीरज चोप्राचे अभिनंदन केले. काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट केले आहे. ‘गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर डौलाने तिरंगा फडकवला आहे. नीरजने World Athletics Championships 2023मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. देशाची सन्मान वाढविल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे काँग्रेसने म्हटले आहे.

भारतीय लष्कराकडून अभिनंदन
बुडापेस्ट येथे World Athletics Championships 2023मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये 88.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय लष्कराने सुभेदार नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे. नीरज चोप्रामुळे पुन्हा एकदा आमची मान अभिमानाने उंचावली आहे, असे लष्कराने म्हटले आहे.

- Advertisment -