घरक्रीडाCopa America : अर्जेंटिना अंतिम फेरीत; यजमान ब्राझीलशी होणार सामना

Copa America : अर्जेंटिना अंतिम फेरीत; यजमान ब्राझीलशी होणार सामना

Subscribe

अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि ब्राझील हे बलाढ्य संघ आमनेसामने येतील.

गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने पेनल्टी शूट-आऊटमध्ये कोलंबियाला ३-२ असे पराभूत करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना यजमान ब्राझीलशी होणार आहे. उपांत्य फेरीत ९० मिनिटे आणि ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळानंतर सामन्यात १-१ अशी बरोबरी होती. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने डाव्हिन्सन सांचेज, येरे मिना आणि एडविन कार्डोना या कोलंबियन खेळाडूंनी मारलेल्या पेनल्टी अडवल्या. तर कर्णधार लिओनेल मेस्सी, लिओनार्डो पारेडेस आणि लौटारो मार्टिनेझ यांनी चेंडू गोलजाळ्यात मारत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला.

कोलंबियाने अर्जेंटिनाला दिली झुंज 

या सामन्यात कोलंबियाने अर्जेंटिनाला चांगली झुंज दिली. दोन्ही संघांना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या. सातव्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर लौटारो मार्टिनेझने गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पिछाडीवर पडलेल्या कोलंबियाने दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना पूर्वार्धात गोल करता आला नाही.

- Advertisement -

पेनल्टी शूट-आऊटमध्ये अर्जेंटिना विजयी

उत्तरार्धात ६१ व्या मिनिटाला लुईस डियाझने अखेर कोलंबियाचे गोलचे खाते उघडले. यानंतरही कोलंबियाने चांगला खेळ सुरु ठेवला. मात्र, त्यांना पुन्हा गोल न करता आल्याने ९० मिनिटे आणि ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळानंतर सामन्यात १-१ अशी बरोबरी होती. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी झालेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये अर्जेंटिनाने ३-२ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि ब्राझील हे बलाढ्य संघ आमनेसामने येतील.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -