Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : मुंबईत वाढत्या कोरोनाचे आयपीएल सामन्यांवरही सावट?

IPL 2021 : मुंबईत वाढत्या कोरोनाचे आयपीएल सामन्यांवरही सावट?

यंदा आयपीएल स्पर्धेला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून दहा साखळी सामने मुंबईमध्ये होणार आहेत. 

Related Story

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवस दररोज २५ हजारांहून अधिक कोरोनारुग्णांची नोंद होत आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार आणि प्रशासन चिंतेत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आधीच लॉकडाऊन करण्यात आले असून मुंबईसुद्धा लॉकडाऊनच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. लॉकडाऊन जरी झाले नाही, तरी मुंबईत कडक निर्बंध घालण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यंदा आयपीएल स्पर्धेला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून दहा साखळी सामने मुंबईमध्ये होणार आहेत.

प्रेक्षकांविना होणार सामने? 

नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाली. कोरोनामुळे या मालिकेचे सामने पुण्यात होण्याबाबत साशंकता होती. मात्र, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत हे सामने पुण्यातच आयोजित करण्याची परवानगी घेतली. या मालिकेचे तिन्ही सामने पुण्यात झाले, पण या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नव्हती. त्यामुळे आता मुंबईत आयपीएलचे सामने झाल्यास ते प्रेक्षकांविनाच होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारची परवानगी 

- Advertisement -

‘मुंबईत आयपीएलचे सामने आयोजित करण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईत ठरल्याप्रमाणे आयपीएलचे सामने होणार आहेत,’ असे काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ म्हणाले होते. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईतआयपीएलचे सामने ठरल्याप्रमाणे होणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत होणारे सामने –

चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स (१० एप्रिल)
राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स (१२ एप्रिल)
राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स (१५ एप्रिल)
पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स (१६ एप्रिल)
दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स (१८ एप्रिल)
चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स (१९ एप्रिल)
कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स (२१ एप्रिल)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स (२२ एप्रिल)
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (२४ एप्रिल)
चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२५ एप्रिल)

- Advertisement -

 

- Advertisement -