टी-२० मालिकेत कोरोनाची एन्ट्री, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोनाची लागण

टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० (T-20 Series) मालिकेला सुरूवात झाली आहे. मात्र, सामन्याच्या सुरूवातीलाच कोरोना विषाणूने (Corona Virus) एन्ट्री घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्करमला (Aiden Markram) कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्लेईंग ११ (Playing-11) मधून त्याला वगळण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु एडन मार्करमला कोरोनाची लागण झाल्याचे टेम्बा बावुमाने नाणेफेकीवेळी सांगितले. मालिकेतील पहिल्या सामन्यातच खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच केएल राहुल दुखापतीमुळे पाचही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीने ऋषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातला हा १६ वा सामना आहे. या आधी खेळल्या गेलेल्या १५ सामन्यात भारताचं पारड जड आहे. ऋषभ पंत हा टी-२० क्रिकेटमधला भारताचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील मालिकेसाठी बीसीसीआयने बायो बबल हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय आता महागात पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कारण पहिल्याच सामन्याआधी खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा निर्णय कितपत योग्य आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

टीम इंडिया संघ –

ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ॠषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल

दक्षिण आफ्रिका संघ –

क्विंटोन डी कॉक, टेम्बा बावुमा, रस्सी वान डेर डुसेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरिअस, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, ऑनरीच नॉर्टजे, तबरेज शम्सी


हेही वाचा : के एल राहुल आफ्रिका सीरिजमधून बाहेर, शेअर केली भावूक पोस्ट