घरक्रीडाIPL 2022 : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, बीसीसीआयकडून वेळापत्रकात महत्त्वाचा बदल

IPL 2022 : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, बीसीसीआयकडून वेळापत्रकात महत्त्वाचा बदल

Subscribe

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र, या हंगामात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आयपीएलच्या दिल्ली संघात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. संघातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना उद्या होणार आहे. मात्र, कोरोनाच्या शिरकावानंतर आयपीएलच्या वेळापत्रकात बीसीसीआयकडून मोठे बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेत हा सामना पुण्याऐवजी मुंबईत होणार असल्याचे जाहीर केले आहे. काल सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाली. या व्यतिरिक्त टीम फिजिओ पॅट्रीक फरहार्ट आणि टीम डॉक्टर अभिजित साळवी, स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य आकाश माने या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या जागी कोणता खेळाडू खेळणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील लढत बुधवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होती. परंतु आता बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयानुसार, ही लढत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. दिल्लीच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मुंबई-पुणे प्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हे सर्व सदस्य विलगीकरणात असून वैद्यकीय टीम त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. आता सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. तसेच त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा डीसीच्या बायो बबलमध्ये प्रवेश मिळणार आहे. तसेच या सर्व सदस्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. आज घेतलेल्या चौथ्या फेरीत सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आता २० एप्रिल रोजी या सर्व सदस्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणार आहे.


हेही वाचा : weather update : दिल्ली, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, गारपीटच्या पावसाचा हवामानाकडून अंदाज


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -