घरक्रीडाकरोनामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट आर्थिक संकटात

करोनामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट आर्थिक संकटात

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगातील बहुतांश खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. जवळपास दोन महिन्यात क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. त्यामुळे बर्‍याच देशांनी आपल्या खेळाडूंच्या वेतनात कपात केली आहे, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कर्मचारी कपात करणेही भाग पडले. आता करोनामुळे क्रिकेट बंद असल्याचा क्रिकेट वेस्ट इंडिजला खूप मोठा फटका बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेले विंडीज बोर्ड आता जणू आयसीयूमध्ये आहे, असे विधान अध्यक्ष रिकी स्केरीट यांनी केले.

करोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेले क्रिकेट वेस्ट इंडिज आता आयसीयूमध्ये आहे. तुम्ही आजरी असल्याने उपचारासाठी डॉक्टरकडे जाता आणि तो औषध देणार इतक्यातच तुम्हाला स्ट्रोक येतो, अशी सध्या आमची अवस्था आहे, असे स्केरीट म्हणाले. वेस्ट इंडिजचा संघ जूनमध्ये इंग्लंड दौर्‍यावर जाणार होता. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा पुढे ढकलण्यात आला. तसेच जुलै-ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ विंडीजमध्ये खेळणार होता. मात्र, या दौर्‍याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे विंडीज बोर्डाच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. आता आर्थिक व्यवस्थापनासाठी एक समिती नेमण्यात आली आहे असेही स्केरीट यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -