घरक्रीडाभावा...१० मिनिटात ऑक्सिजन सिलेंडर पोहोचेल! रैनाच्या मदतीला धावला सोनू सूद

भावा…१० मिनिटात ऑक्सिजन सिलेंडर पोहोचेल! रैनाच्या मदतीला धावला सोनू सूद

Subscribe

सुरेश रैनाला ऑक्सिजन सिलेंडरबाबत ट्विटरवरून विचारणा करावी लागली.

भारतात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. ऑक्सिजन, बेड्स आणि लसी आदींचा तुटवडा भासत आहे. अगदी लोकप्रिय खेळाडूंनाही ऑक्सिजन सिलेंडर मिळणे अवघड झाले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ऑक्सिजन सिलेंडरबाबत ट्विटरवरून विचारणा करावी लागली. ‘मला मेरठ येथे माझ्या मावशीसाठी त्वरित ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता आहे. ती ६५ वर्षांची असून तिला फुफ्फसांच्या संसर्गाने ग्रासले आहे,’ असे रैना त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. तसेच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही त्याच्या ट्विटमध्ये टॅग केले. परंतु, त्याच्या या ट्विटला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने उत्तर दिले.

- Advertisement -

ऑक्सिजन सिलेंडर तुझ्यापर्यंत पोहोचेल

‘मला आणखी माहिती पाठव. मी तुझ्यापर्यंत ऑक्सिजन सिलेंडर पाठवण्याची व्यवस्था करतो,’ असे सोनू त्याच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणाला. त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट केले. ‘भावा…१० मिनिटात ऑक्सिजन सिलेंडर तुझ्यापर्यंत पोहोचेल,’ असे तो या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाला. भारतामध्ये मागील वर्षीपासून कोरोनाने थैमान घातले आहे. अगदी सुरुवातीपासून सोनू लोकांना विविध प्रकारची मदत करत आहे.

- Advertisement -

सोनूची फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत

त्याचे स्वतःचे फाऊंडेशनही आहे, ज्याच्या माध्यमातून तो कोरोना काळात लोकांची मदत करत आहे. आज रैनाला मदत करण्याआधी त्याने बंगळुरू येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय करत त्यांचे जीव वाचवले होते. सोनू करत असलेल्या या कामाचे सोशल मीडिया आणि मीडियातून नेहमीच कौतुक होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -