घरक्रीडाCorona Vaccination : लसीकरणाला भारतीय क्रिकेटपटूंचा चांगला प्रतिसाद, पंतनेही घेतला पहिला डोस

Corona Vaccination : लसीकरणाला भारतीय क्रिकेटपटूंचा चांगला प्रतिसाद, पंतनेही घेतला पहिला डोस

Subscribe

कोरोना लसीकरणाला भारतीय क्रिकेटपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून येत आहे. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने या सुविधेचा लाभ घेत गुरुवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. याबाबतचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला. ‘मी आज लसीचा पहिला डोस घेतला. तुम्हीसुद्धा पात्र असल्यास लस घ्या. जितक्या लवकर आपल्याला लस मिळेल तितक्या लवकर आपण या विषाणूचा पराभव करू शकू,’ असे २३ वर्षीय पंतने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले.

क्रिकेटपटूंचा चांगला प्रतिसाद

कोरोना लसीकरणाला भारतीय क्रिकेटपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच मुंबईत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्याचप्रमाणे शिखर धवन, अजिंक्य रहाणे, उमेश यादव, दिनेश कार्तिक आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंनी लस घेतली असून सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही केले आहे.

- Advertisement -

शास्त्रींनी सर्वात आधी घेतली लस

भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित व्यक्तींमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्वात आधी लस घेतली होती. सुरुवातीला जेष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येत होते. त्यावेळी शास्त्रींनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लस घेतली होती. त्यानंतर १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्यापासून खेळाडूही लस घेताना दिसत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -