Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Corona Vaccination : तुमच्या सुपरपॉवर्स पुन्हा वाढवा! शुभमन गिलने घेतली लस

Corona Vaccination : तुमच्या सुपरपॉवर्स पुन्हा वाढवा! शुभमन गिलने घेतली लस

कोरोना लसीकरणाला भारतीय क्रिकेटपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Related Story

- Advertisement -

भारतामध्ये १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून भारताचा सलामीवीर शुभमन गिलने शनिवारी या सुविधेचा लाभ घेतला. भारतीय क्रिकेटपटूंनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आता २१ वर्षीय गिलचाही समावेश झाला आहे. त्याने लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला. ‘तुम्हाला जितक्या लवकर संधी मिळेल, तितक्या लवकर तुमच्या सुपरपॉवर्स पुन्हा वाढवा. सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी खूप मेहनत घेत आहेत. त्यांचे सर्वांचे आभार,’ असे गिलने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले.

क्रिकेटपटूंचा चांगला प्रतिसाद

कोरोना लसीकरणाला भारतीय क्रिकेटपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गिलच्या आधी भारताचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, उमेश यादव, दिनेश कार्तिक आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंनी लस घेतली असून सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही केले आहे. तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

गिलच्या कामगिरीकडे लक्ष 

- Advertisement -

गिलने शनिवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. आता त्याला दुसरा डोस हा इंग्लंडमध्ये घ्यावा लागणार आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी गिलची भारतीय संघात निवड झाली आहे. भारत या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना, तर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात सलामीवीर म्हणून गिल कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

- Advertisement -