घरक्रीडामोहम्मद शमीला दरमहा पत्नीला द्यावी लागणार १ लाख ३० हजारांची पोटगी

मोहम्मद शमीला दरमहा पत्नीला द्यावी लागणार १ लाख ३० हजारांची पोटगी

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकता न्यायालयाने दणका दिला आहे. कोलकाता न्यायालयाने त्याची पत्नी हसीन जहाँ हिला दरमहा तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकता न्यायालयाने दणका दिला आहे. कोलकाता न्यायालयाने मोहम्मद शमी याला पत्नी हसीन जहाँला दरमहा तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (court directs cricketer mohammed shami to pay wife hasin jahan 1 lakh 30 thousand every month)

हसीन हिने पोटगीसाठी २०१८ मध्ये कोर्टात केस दाखल करत तब्बल १० लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी केली होती. यातील ७ लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित तीन लाख रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील असे कोर्टाने सांगितले होते.

- Advertisement -

दरम्यान, मोहम्मद शामीचे वार्षिक वेतन हे २०२०-२१ मध्ये जास्त होते. त्यानुसार या पोटगीची मागणी करण्यात आली, अशी माहिती हसीनच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला दिली. शमीचे या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते

याप्रकरणी मोहम्मद शामीचे वकील सेलिम रहमान यांनी देखील कोर्टात युक्तिवाद केला. “हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करते. तिचे स्वत:चे उत्पन्न असून तिने पोटगी मागणे चुकीचे आहे”, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर शमीला हसीन हिला दरमहा १ लाख ३० हजार रुपये पोटगी देण्यास सांगितले. यातील ५० हजार रक्कम ही हसीनला तर उर्वरित रक्कम ही तिच्या मुलीसाठी दिली जाणार आहे. कोर्टाच्या या निकालाबाबत हसीनने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

गतवर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, शमीची पत्नी हसीन जहाँने सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा फोटो शेअर केला त्या माध्यमातून तिने शामीवर निशाणा साधला होता. दोघांचे संबंध हे ताणले गेले होते. यामुळे तिने त्याच्यापासून फारकत घेत घटस्फोट घेतला होता.


हेही वाचा – धक्कादायक! पाच दिवसांत पुण्यातील नदीपात्रात आढळले दोन महिलांसह ४ मृतदेह

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -