IND vs NZ Test series : भारताचे ६ दिग्गज खेळाडू बाहेर, पण विश्वविजेत्याविरूध्द टीम इंडिया प्रबळ दावेदार

टी-२० विश्वचषकात मिळवलेल्या शानदार विजयानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे

टी-२० विश्वचषकात मिळवलेल्या शानदार विजयानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टी-२० नंतर आता क्रिकेटच्या क्लासिक खेळाची सुरूवात होणार आहे. जिथे प्रत्येक खेळाडूची कसोटी असते कदाचित यामुळेच याला कसोटी क्रिकेट म्हंटले जाते. भारत आणि न्यूझीलंडमध्ये २५ नोव्हेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याची सुरूवात होणार आहे. अशातच भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आपल्या प्रमुख ६ फलंदाजांना विश्रांती दिली आहे. त्या खेळांडूचा टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये नियमित समावेश असतो. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाची नियमित संघामधील निम्म्यापेक्षा जास्त खेळांडूना विश्रांती दिल्यानंतर देखील भारतीय संघ विश्वविजेत्याविरूध्द प्रबळ दावेदार मानले जात आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये गुरूवारी कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे असणार आहे तर उपकर्णधारपदाची धुरा चेतेश्वर पुजाराकडे असेल. प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल पहायला मिळू शकतो. नंबर ४ साठी श्रेयश अय्यर किंवा सुर्यकुमार यादव फलंदाजीसाठी येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नव्या फलंदाजाच्या पदार्पणामागचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाची रणनिती आहे. संघाने आपल्या सहा प्रमुख क्रिकेटपटूना विश्रांती दिली आहे. याशिवाय हनुमा विहारीला भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आले आहे.

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाचा हिस्सा नसणार आहे. त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती दिली असून कोहली दुसऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. रोहित शर्माला पूर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना देखील आराम देण्यात आला आहे.

भारतीय संघाचा संभावीत संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयश अय्यर/सुर्यकुमार यादव, ऋध्दिमान साहा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव/अक्षर पटेल/ मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा, उमेश यादव,


हे ही वाचा: Gautam Gambhir : गौतम गंभीरला जिवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ