टी-२० वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीम करणार भारताचा दौरा; वाचा सामने कुठे होणार?

यंदा टी-२० वर्ल्ड कप होणार असून, या स्पर्धेतील सर्व संघांनी सरावाला सुरूवात केली आहे. सध्या आयपीएलटचा हंगामा सुरू आहे. यामध्ये भारतासह परदेशातील अनेक खेळाडू आपली उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.

यंदा टी-२० वर्ल्ड कप होणार असून, या स्पर्धेतील सर्व संघांनी सरावाला सुरूवात केली आहे. सध्या आयपीएलटचा हंगामा सुरू आहे. यामध्ये भारतासह परदेशातील अनेक खेळाडू आपली उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. मात्र टी २० वर्ल्ड कपपूर्वी तयारीचा भाग म्हणून वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाची टीम सप्टेंबर महिन्यात भारताचा दौरा करणार आहे. दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची टी २० सीरिज होणार आहे. टी २० वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमचं वेळापत्रक चांगलंच व्यस्त आहे.

ऑस्ट्रेलियन टीम ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड विरूद्धच्या वन-डे मालिकेचं यजमानपद भूषविणार आहे. तर भारता विरूद्ध सप्टेंबर महिन्यात टी २० मालिका खेळणार आहे. यावर्षी १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत टी20 वर्ल्ड कप होणार आहे.

ऑस्ट्रेलियानं यापूर्वी २०१८-१९ साली भारताचा दौरा केला होता. त्यावेळी ३ सामन्यांची टी २० सीरिज १-१ नं ड्रॉ झाली होती. यंदा भारताविरूद्ध टी २० मालिका जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. भारताच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम त्यांच्याच देशात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरूद्ध ३-३ सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे.

टी २० वर्ल्ड कपनंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 साली ऑस्ट्रेलियन टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत ४ टेस्ट मॅचची मालिका खेळली जाईल. ऑस्ट्रेलियन टीम यापूर्वी २०१७ साली टेस्ट सीरिज खेळण्यासाठी भारतामध्ये आली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला ती मालिका गमावावी लागली होती.

यापूर्वी २०१३ साली देखील भारताने ऑस्ट्रेलियावर क्लीन स्वीप मिळवला होता. ऑस्ट्रेलियानं २००४-०५ साली शेवटती भारतामध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती. आता पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलियन टीमचा हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल.


हेही वाचा – सामन्यादरम्यान धोनीने बॅट चावण्याचा अमित मिश्राने केला खुलासा; वाचा नेमक काय म्हणाला…