ब्रिस्बेन ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट?, ऑस्ट्रेलियाची स्पेशल तयारी सुरू

क्रिकेटच्या चाहत्यांना आता लवकरच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहायला मिळणार आहे. ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये (Brisbane Olympics) क्रिकेटचा समावेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) स्पेशल तयारी सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.

Asian Games 2022 Cricket matches 40 tournaments to be held Asian Games

क्रिकेटच्या चाहत्यांना आता लवकरच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहायला मिळणार आहे. ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये (Brisbane Olympics) क्रिकेटचा समावेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) स्पेशल तयारी सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, क्रिकेटला ऑलिम्पिकचा भाग बनवणे आमचे लक्ष्य असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले. दरम्यान, 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा (Cricket) समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, क्रिकेटचा समावेश न झाल्यास ब्रिस्बेनमधील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्रयत्न करत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी योजनांबद्दल सांगितले होते. तसेच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने क्रिकेटसह 8 खेळांची यादी तयारी केली आहे. ज्यांचा लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या महिन्याच्या अखेरीस आयोजकांसमोर आपले मत मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑलिम्पिकचे आयोजन करणारे शहर कोणत्याही नव्या खेळांचा समावेश करू शकतात. मात्र, या खेलांच्या समावेशासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची परवानगी असणे महत्वाचे असते. त्यामुळे क्रिकेटचा समावेश झाल्यास खेळाडूंसाठी दिलासादायक ठरणार आहे. तसेच, क्रिकेटच्या खेळाडूंसमोर मोठे आव्हान असणार असेल.

दरम्यान, भविष्यात एकदाच क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता. केस पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.

नुकताच पार पडलेल्या बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी दमदारी कामगिरी केली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 61 पदके जिंकली आहेत. यामध्ये 22 सवर्णपदक, 16 रौप्यपदक आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारत पदतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला.

दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी 12 पदके जिंकली आहेत. यामध्ये 6 सुवर्णपदक, १ रौप्यपदक आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये 10 पदके आली. तसेच, बॉक्सिंगमध्ये भारताने 3 सुवर्णांसह 7 पदके जिंकली आहेत.


हेही वाचा – CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने जिंकले 200 वे सुवर्णपदक