घरक्रीडादुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, १-१ ची बरोबरी

दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, १-१ ची बरोबरी

Subscribe

भारतीय संघाची उत्कृष्ट खेळी

चेन्नई कसोटीमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाने इग्लंडचा ३१७ धावांनी धुव्वा उडवला आहे. अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडचा टीकाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघासाठी ही कसोटी जिंकणे आवश्यक होते. पहिल्या कसोटीच्या पराभवानंतर विराट सेनेने पुनरागमन केले आहे. तसेच १-१ अशी बरोबरी केली आहे. पहिल्या कसोटीमध्ये पराभव झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी भारतीय संघाला ही कसोटी जिंकणे आवश्यक होते.

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या खेळाडूंना चित करत सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली होती. दुसऱ्या कसोटी टेस्टमध्ये इंग्लंडने ३ बाद ५३ धावांवर खेळण्यास सुरुवात केली होती.

- Advertisement -

इग्लंडचा फलंदाज लॉरेन्स बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सने संघाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. परंतु कुलदीप यादवनं बेन स्टोक्सला बाद करुन टेस्टमधली पहिलीच विकेट घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेलने ५ गडी बाद करत मोलाची कामगिरी केली आहे. भारतीय संघाने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयापैकी सर्वात मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे. या विजयामुळे भारतीय संघाने चौथ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. गुणतक्त्यात भारताच्या विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी आहे. तर इंग्लंडची ६७.० अशी टक्केवारी आहे. भारताला इग्लंडचा २-१ किंवा ३-१ असा पराभव करुन फायनलमध्ये जावे लागेल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -