IND vs NZ Test series : कर्णधार रहाणेसाठी कोच द्रविंड यांचा क्लास; खुद्द द्रविड यांनी केली बॉलिंग

न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेत मिळवलेव्या घवघवीत यशानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे

न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेत मिळवलेव्या घवघवीत यशानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिल्या सामन्याचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. दरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. २५ नोव्हेंबर म्हणजेच गुरूवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाकडून जोरदार तयारी केली जात आहे. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला खेळांडूकडून सराव करून घेताना खुद्द प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कर्णधार अजिंक्य रहाणेला गोलंदाजी केली आहे. राहुल द्रविड गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

द्रविड यांचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डातर्फे (BCCI) ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. सोबतच बीसीसीआयने म्हंटले की, “जेव्हा भारतीय संघाचे प्रशिक्षक सरावादरम्यान मैदानात स्वत: गोलंदाजी करताना दिसतात.

सरावादरम्यान बीसीसीआयने शेयर केलेल्या २१ सेकंदाच्या व्हिडीओत प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हातात चेंडू पहायला मिळत आहे. तर ते गोलंदाजीसाठी तयारी करत आहे. दरम्यान दुसरीकडे कर्णधार अजिंक्य रहाणे नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. द्रविड संघाच्या कर्णधाराचा क्लास घेत असल्याचा हा व्हिडीओ खुद्द बीसीसीआयने पोस्ट केल्याने क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाविरोधात काही दिवसांपूर्वीच ३ टी-२० सामने खेळले. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने तीनही सामने जिंकून न्यूझीलंडला चितपट केले. मात्र आता नव्या कर्णधाराच्या रूपात भारतीय संघ एका नवीन अध्यायासाठी सज्ज झाला आहे.


हे ही वाचा: Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; मुलीचा झाला बाबा